२५ वर्षीय तरुणाला भर चौकात संपवलं, कारण इतकंच की…
गुन्हेगारी प्रमाण वाढत आहे,दहशत वाढल्यामुळे अनेक चुकीच्या घटना घडतात, यामुळे चुकीच्या गोष्टीच फेव वाढत आहे, यातून एक अशीच घटना घडली आहे , या घटनेमुळे यवतमाळ हादरला आहे, शहरातील एका २५ वर्षीय तरुणाची जुन्या वादातून भर चौकात हत्या करण्यात आली आहे. शहरातील इंदिरा चौकात घडली. या घटनेमुळे संपूर्ण कळंब शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अश्विन उर्फ अब्दुल राऊत राहणार हलबिपुरा, कळंब असे मृत तरुणाचे नाव आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अप्पर पोलीस अधिक्षक पियुष जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. शहरात गजबजलेला चौक म्हणून इंदिरा चौकाची ओळख आहे. याच चौकात जुन्या वादातून सोमवारी सायंकाळी हलबिपुरा येथील अश्रिन उर्फ अब्दुल राऊत या २५ वर्षीय तरुणावर अज्ञात दोन ते चार युवकांनी अचानक हल्ला केला.
त्यानंतर अश्विन याला चाकुने आणि हातोडीने डोक्यावर, पोटात छातीवर गंभीर घाव घालीत गंभीर जखमी केले. त्यानंतर मारेकऱ्यांना त्या ठिकाणाहून पळ काढलाघटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेल्या अश्विनला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी तपासणीनंतर अश्रिनला मृत घोषित केले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी कळंब येथे भेट घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजित राठोड, सहायक पोलीस निरीक्षक अभय चौथनकार यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलीस करीत आहे.