किडोज प्ले हाऊस इंटरनॅशनल स्कूल चा वार्षिक समारंभ नुकताच पार पडला.
आंबेगाव पठार येथील नामांकित किडोज प्ले हाउस इंटरनॅशनल स्कूल चा वार्षिक समारंभ नुकताच पार पडला. किडोज स्कूल मधील लहान विद्यार्थ्यांनी स्टेज वर अगदी भन्नाट डान्स सादरीकरण केले.या कार्यक्रमांत भावगीते, देशभक्तीपर गीते अशी वेगवेगळी गीते, मुलांनी गोड वेशभूषा करून सादर केली.आपल्या मुलांचे सादरीकरण पाहून पालकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून, सिध्दार्थ संगीता शेलार ( लेखक ) उपस्थित होते. असतात.त्याचबरोबर विशेष उपस्थिती म्हणून विवियाना स्कूल,पुणे च्या अध्यक्षा सौ.गौरी जोशी मॅडम ,नवोदित पत्रकार अजय कोपनर उपस्थित होते.विशेष अतिथी यांच्या हस्ते विदयार्थ्यांना सर्टिफिकेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाबद्दल किडोज स्कूल च्या संस्थापिका, प्रिंसिपल सौ.किर्ती कोकाटे मॅडम पुणे विशेष न्यूज शी बोलताना म्हणाल्या की, आमच्या विद्यार्थ्यांचे या स्टेजवरती जोरदार सादरीकरणाचे कारण म्हणजे त्यांचा स्वतः हा वरचा आत्मविशवास.शाळेत घेतल्या जाणाऱ्या वर्षभरातील लहान – मोठ्या उपक्रमातून हे सगळे शक्य झाले आहे. मुलांचे पालनपोषण कसे करायचे ते लादून नाही तर त्यांच्या स्वयंप्रेरणेने व्हायला हवे. मग वेगवेगळ्या क्रियाशील क्लृप्त्या लावाव्या लागतात. तेंव्हा या मुलांच्या सुप्त गुणांना वाव देता येतो. तेंव्हाच विद्यार्थी हे स्वयंप्रेरीत होत असतात.
यावेळी किडोज स्कूलच्या शिक्षिका अश्विनी शिंदे,सीमा कटोरे ,सुषमा कांबळे, पूजा भार्गुडे, स्वाती गायकवाड यांच्यासह मोठया संख्येने पालक उपस्थित होते.