मुलानं भर रस्त्यात पढला नमाज, ट्रॅफिक तुंबल्यामुळे लोक भडकले, व्हिडीओ होतोय व्हायरल.
हा व्हिडियो चांगला कि वाईट यावर काही भाष्य न केलेलं बर , सोशल मिडीयावर हा व्हिडीओ होतोय व्हायरल,धर्म नियमाच मुलगा पालन करत आहे म्हणून कौतुक कराव कि एवढ्या लहान मुलावर धर्म बिम्ब्वला म्हणून विरोध करावा हे पाहणार्याने ठरवावे ,एक लहान मुलगा भर रस्त्यावर नमाज पढत होता. त्याच्यामुळे रस्त्यावर अक्षरश: ट्रॅफिक तुंबलं होतं. ट्रॅफिक पोलिसांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयारच नव्हता. अखेर त्याचा नमाज पूर्ण होईपर्यंत पोलिसांनी त्याला संरक्षण पुरवलं.
हा व्हिडीओ व्हायरल होतच नेटकऱ्यांमध्ये शाब्दिक द्वंद्व सुरू झालं आहे. काही जण या मुलाचं कौतुक करतायेत तर काही जण त्याच्यावर टीका करतायेत. काही जण पोलिसांना दोषी समजतायेत तर काही जण पोलिसांच्या कृतीचं स्वागत करतायेत. तुम्हाला काय वाटतं? कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं?हा व्हिडीओ प्रसिद्ध पाकिस्तानी लेखक Tarek Fatah यांनी शेअर केला आहे.
“एखादा देश इतक्या मुर्खांची निर्मिती कशी करतो? पाकिस्तानला हे कसं शक्य होतं?” अशा आशयाची कॅप्शन देत या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी पाकिस्तानला उपरोधिक टोला लगावला आहे. पण हा व्हिडीओ खरंच पाकिस्तानमधील आहे का? याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान हा व्हिडीओ आतापर्यंत ६ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर जगभरातील नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींच्या मते इतकं धार्मिक होणं योग्य नाही.
प्रत्येकानं आपली श्रद्धा स्वत:पूरती मर्यादीत ठेवावी. त्याचा त्रास इतरांना होणार नाही याची काळजी घ्यावी. तर काहींच्या मते हे खूपच सुंदर दृश्य आहे. धर्माच्या पलिकडे जाऊन हा व्हिडीओ पाहावा