गडाखांच्या लग्नात वऱ्हाडी रस्ता चुकले; शरद पवार यांच्या सोबत घडले भलतेच काही, पहा बातमी सविस्तर
अस फार कमी वेळच होत , लग्न गडाखाचे पण धावपळ पवारांची झाली ,माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन व माजी आमदार चंदशेखर घुले-पाटील यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्या विवाहाच्या निमित्ताने रविवारी (ता. २२ जानेवारी) लग्नसमारंभास आलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे हेलिकॉप्टर नियोजित हेलिपॅडवर न उतरता चुकीने दुसऱ्या हेलिपॅडवर उतरवले गेले. हा गंमतशीर प्रकार सोनई येथे घडला. मुळा सहकारी साखर कारखान्याच्या हेलिपॅडवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती.
मात्र त्यांचे हेलिकॉप्टर पायलटच्या चुकीने दुसऱ्याच हेलिपॅडवर उतरले आणि दोन्ही हेलिपॅडवरील प्रशासन व नियोजनातील यंत्रणेची एकच धावपळ उडाली. सोनई-शिंगणापूर रस्त्यावरील मुलानी माथा येथे तयार केलेल्या हेलिपॅडवर माजी मंत्री विश्वजित कदम यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तर मुळा कारखान्याच्या हेलिपॅडवर पवारांचे हेलिकॉप्टर उतरणार होते. साहजिकच कारखान्याच्या हेलिपॅडवर मोठा लवाजमा पवार साहेबांच्या स्वागताला उपस्थित होता. येथे सर्व प्रोटोकॉल नुसार यंत्रणा तैनात ठेवलेली असताना शरद पवारांचे हेलिकॉप्टर चुकीने मुलानी माथ्यावर उतरले.
याठिकाणी फक्त एक मोटार व दोन सुरक्षा कर्मचारी पाहून झालेली चूक पायलटच्या लक्षात आली. स्वागत, प्रोटोकॉल व स्थानिक सुरक्षेचा विचार न करता तेथे असलेल्या राजेंद्र गुगळे यांच्या इनोव्हा मोटारीत बसून पवारांनी चालक संपत मरकड यांना विवाहस्थळी घेण्यास सांगितले. प्रोटोकॉलशिवाय अचानक पवार मंडपात आल्याने उपस्थित अचंबित झाले. पवार साहेबांना घेऊन जाताना एक आगळावेगळा अनुभव आल्याचा अनुभव चालक मरकड यांना आला असणार. यानंतर सुरक्षा कर्मचारी अशोक राख यांना घेवून शरद पवार यांच्या पायलटने हेलिकॉप्टर मुळा कारखान्यावर नेले.
पवार साहेब आले म्हणून सर्व यंत्रणा अलर्ट झाली. उतरलेल्या हेलिकॉप्टरमध्ये पवार दिसत नसल्याने सर्वांची चिंता वाढली होती. सुरक्षा कर्मचारी अशोक राख यांनी घडलेला प्रकार सांगितला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला..