नगर जिल्हा हादरला; २० रुपयांसाठी एका चांभाराचा केला खून ! पहा बातमी सविस्तर

देश आता चंद्रावरती पोहोचला मात्र समाजात आजही अपप्रवृत्ती जिवंत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वांबोरी या ठिकाणी एक धक्कादायक प्रकार घडला. २०रुपये मागितले म्हणून राग आला बेदम मारहाण केली.
चर्मकार समाजातील विलास कांबळे यांचे गटईचं दुकान होत, दररोज मोलमजुरी करून ते आपलं उदरनिर्वाह करत होते, जुन्या चप्पल ची डागडुजी करून त्यातून जे पैसे मिळतील त्यावर ते कुटुंब चालवत होते, विलास कांबळे यांच्याकडे चप्पल दुरुस्त करण्यासाठी एक व्यक्ती आला जो कथित गावगुंड आहे. त्याची चप्पल दुरुस्त केल्यानंतर वीस रुपये द्या अशी मागणी विलास कांबळे यांनी केली होती, मात्र ‘मला पैसे मागतो याचा राग आल्याने या गुंडाने विलास कांबळे यांना बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांचा एक डोळा निकामी झाला.
अहमदनगर मधील रुग्णालयामध्ये त्यांच्या वरती उपचार सुरू होते. या मारहाणीत त्यांना मोठी दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला, वीस रुपयांसाठी विलास कांबळे यांना यांचा बळी गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर मोठ् संकट कोसळल विलास कांबळे यांना बेदम मारहाण करून खून करणाऱ्या गावगुंड आणि समाजद्रोही यांच्यावरती खुणाचा गुन्हा दाखल करून आणि अटक करा अशी मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली होती.
प्रशासनानं या घटनेचे गांभीर्य ओळखत ही मागणी लवकर पूर्ण केली. मयताचा मुलगा गोरक्षनाथ कांबळे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस स्टेशन येथे भाऊसाहेब वाघमारे याच्या विरुद्ध भावी कलम 302, 504 ,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी वाघमारे याला पोलिसांनी अटक केली आहे.