पाळीव प्राण्यांवर सगळेजण खुप प्रेम करत असतात प्रत्येकाला आपल्या घरामध्ये एक पाळीव प्राणी पाळण्याची आवड असते. कोणी मांजर, कुणी ससा, कोणी कुत्रा असे वेगवेगळे प्राणी आपण घरात पाळत असतो. आणि त्या घरात पाळलेल्या प्राण्यांना अगदी घरातील सदस्य असल्याप्रमाणे प्रेम देखील करत असतो. ते प्राणी म्हणजे आपल्या आयुष्यातला एक हिस्सा असतो. कधी कधी आपण आपल्या ताटातला भाकरीचा तुकडा सुद्धा त्यांना टाकायला कमी करत नाही.
एवढं जीव लावत असताना सुद्धा काही ठिकाणी विपरीत घडत असतं. जे टुकार पोरं असतात, टवाळखोरी करणारे ज्यांना कोणाचाही धाक नसतो. ते ना आईला घाबरतात, ना बापाला, ना कुणालाच असे टवाळखोर पोरं काय करतील सांगता येत नाही किंवा त्यांचा काही भरोसा नसतो. अशीच एक घटना या बातमीमध्ये घडली आहे. सदरील घटनाही चंद्रपूर जिल्ह्यातली आहे एका गावात असलेल्या नाल्याजवळ काही पोर बसलेले असतात आणि त्या ठिकाणी बसल्या बसल्या टाईमपास करायचा म्हणून या टोळक्याने एका कुत्र्याला पकडून आणले.
त्यानंतर त्या कुत्र्याच्या मानेला एक दोरी बांधली व त्यानंतर त्याच्या पोटाला ही एक दोरी बांधली व या दोरीला भला मोठा दगड बांधण्यात आला. हे सगळं होऊपर्यंत एक तरुण त्या कुत्र्याला पकडून असतो ही पोर जेव्हा त्या कुत्र्याला दोरीने बांधत असतात त्यावेळेस तो कुत्रा पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण यामधील एक तरुण त्याला पुन्हा खेचून आणतो. त्यानंतर त्या कुत्र्याच्या मानेशी व पोटाशी दोरी बांधून त्या दोरीला दगड बांधतात आणि त्या कुत्र्याला पाण्यात फेकून देतात. असा संताप जनक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये घडला आहे. आणि हे सगळं घडत असताना नाल्याच्या काठाशी बसून असलेले सर्वजण तो सगळा प्रकार पाहत होते. यामध्ये कुत्र्याला या प्रकारची कल्पना आली होती व ते सगळं घडू नये म्हणून त्याने प्रतिकार देखील केला होता. व्हिडिओमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं.
एका पाळीव जीवाला त्याच्या शेपटीला अंगाला दोरीमध्ये दगड बांधून निर्दयतेने पाण्यात फेकून त्या कुत्र्याची मौज घेतल्याचे व्हिडिओमध्ये आपणास पाहायला मिळतील. आपण बऱ्याचदा भटक्या कुत्र्याच्या शेपटीला कधी फटाके लावणे, होळीमध्ये विनाकारण कुत्र्यांना रंग लावणे किंवा अजूनही वेगवेगळे प्रकार करताना तुम्ही पाहिलं असेल. पण चंद्रपूर मध्ये एका कुत्र्याच्या मानेला दगड बांधून पाण्यात फेकण्याचा जो संताप जनक प्रकार घडला आहे तो कुठेही पाहिला नसेल. त्या कुत्र्याचे नशीब चांगले म्हणून त्याला बांधलेला तो दगड पाण्यात निसटतो आणि तो कुत्रा तिथून निघून जातो. तो त्याचा जीव वाचवून तिथे बसलेल्या टवाळखोर पोरांपासून धूम ठोकतो. हा सगळा प्रकार मोबाईलच्या कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. आणि सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे तीव्र संताप देखील व्यक्त केला जात आहे.