स्वप्न तर मोडलीत, पण मुलभूत गरजाही डोळ्यासमोरून वाहून गेल्यात. पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत.
गेले किती दिवसापासून परतीचा पाऊस हा संपूर्ण राज्यभर चालू आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांच्या संदर्भात जवळजवळ 80 ते 85 टक्के नुकसान झालेले आहे. यंदाच्या वर्षी झालेल्या पावसामुळे सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांना मोठा फटका बसणार आहे.
बरेच दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हे प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. मात्र प्रयोगशील शेतकऱ्याबरोबरच हंगामी पिके घेणारे शेतकरी वर्ग उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने जे सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे त्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले आहे. मागील महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस झाला. यामुळे कित्येक सोयाबीन पिकामध्ये पाणी साचले होते. त्यावेळेस जवळपास 40 टक्के पिकांचे नुकसान झालेले होते मात्र सोंगणला आलेला सोयाबीन तोही या पावसामुळे पाण्यात वाहून गेला आहे.
नाशिक जिल्ह्यात कांदा, द्राक्ष, डाळिंब या पिकांबरोबरच सोयाबीन आणि मका हे पीक देखील घेतले जातात. यंदाच्या वर्षी मका पीक व सोयाबीन हे दोन्ही मुसळधार पावसात टिकणारे पीक असताना या झालेल्या पावसामध्ये त्या पिकांची अत्यंत वाईट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसापासून चालणाऱ्या पावसामुळे हजारो हेक्टर सोयाबीन आता पाण्यात सोडून दिली आहे. यावर्षी होणाऱ्या हंगामी यावर्षी होणाऱ्या या पावसाने हंगामी पिकांचे चांगलेच नुकसान झाले आहे. यामुळे खाद्यतेल व पशुखाद्य महाग झाल्याने दुधाचे दर देखील वाढू शकतात. या अवकाळी, परतीच्या पावसाने सोयाबीन सारख्या पिकाच्या संदर्भात जवळजवळ हेक्टरी 80 ते 85 टक्के नुकसान झाले. आणि याचमुळे यंदाच्या वर्षी सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
खरंतर सोयाबीन सारखी पिक आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी महत्त्वाचे ठरत असते, पण आता होणाऱ्या पावसामुळे यंदाच्या सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे. आणि त्यामुळे हे पीकही पाण्यात गेले असल्याने शेतकरी अगदी मेटाकुटीला आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. या झालेल्या पावसामुळे सोयाबीन शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामुळे या नुकसानीची पंचनामे करून मदत मिळावी या मायबाप सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून भरघोस मदत करणे अपेक्षित आहे.