धावत्या स्कूलबस मध्येच चालकाला आला हृदयविकारचा झटका अन विद्यार्थी मात्र…, पहा बातमी सविस्तर.
अपघाताच्या अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील बेशिस्त वाहन चालक किंवा वाहन चालकाच्या चुकीमुळे अनेकांचे जीव जातात. मात्र एखादा वाहन चालक हा माणूसकीचे दर्शन घडवत असतो. अशाच एका वाहन चालकाची ही बातमी आहे. कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील पिंपळवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावरती विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला अचानक अपघात झाला मात्र हा अपघात कसा झाला तर याबद्दल जाणून घेऊ.
बस मध्ये विद्यार्थी असल्यामुळे चालकान सतर्कता राखवत ही बस झाडावर आदळवली कारण या बस चालकाला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. कोल्हापुरात बस चालकाच्या रूपाने या शालेय विद्यार्थ्यांना विघ्नहर्ताच भेटला आहे. कारण चालू गाडीमध्ये जर या चालकाला हृदयविकाराचा झटका आला असता आणि जास्त कमी झाला असता बरं वाईट झालं असतं तर या सर्वच मुलांच्या जीवावरती बेताल असत.
म्हणून या चालकाने आपली शारीरिक परिस्थिती काहीतरी बिघडत आहे हा अंदाज घेत बस झाडावरती आढळवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बस सुरक्षित ठिकाणी थांबवून या चालकान मात्र जगाचा निरोप घेतला. सतीश कांबळे वय वर्ष 35 असं स्कूल बस चालकाचे नाव त्यांनी विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले मात्र चालू गाडी बंद करून आपला प्राण सोडला.
सतीश कांबळे यांच्या मृत्यू नंतर बस मधली मुलं प्रचंड घाबरली होती. सतीश कांबळे यांना तात्काळ कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केला परंतु त्यांचा मृत्यू झाला होता काळ आला तरी त्यांची कडवी झुंज देऊन त्यांनी मुलांचे प्राण वाचवले आणि त्यामुळेच मरता मरता एखाद्याच्या कामी येणे ज्याला म्हणतात याचे उत्तम उदाहरण आज पाहायला मिळाले. कांबळे कुटुंबावरती सतीश कांबळे यांच्या जाण्यानं दुःखाचा डोंगर कोसळला आहे.