राष्ट्रकुल स्पर्धेत देशासाठी पदक जिंकणाऱ्या अविनाश साबळेच्या कुटुंबियांची मदतीची हाक ! पहा सविस्तर
काही दिवसापूर्वी बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याच्या मुलाने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये इतिहास घडवला आहे. सिल्वर मेडल जिंकून त्याने भारतासोबतच आपल्या बीड जिल्ह्यातले नाव कमावले आहे. हा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मुलगा असून नाव अविनाश साबळे आहे. या अविनाशने बर्मिंग हम मध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये 3000 मीटर स्टीपल चेस स्पर्धेत आपलं नाव नोंदवत मेडल पटकावले आहे.
अश्या देशासाठी ही ऐतिहासिक कामगिरी करणारे अविनाशच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. आणि त्यामुळे त्याच्या आई आणि वडिलांनी पत्र लिहून राज्य सरकारकडे तशी मागणी केली आहे. या पत्रामध्ये त्यांनी इतर राज्यातील खेळाडूंना मिळालेल्या मदतीचा उल्लेख देखील केलेला आहे. तर पाहूया या पत्रामध्ये नेमकं काय लिहिला आहे.
सदरील पत्र हे अविनाश चे वडील मुकुंद साबळे यांच्यासह अविनाशच्या आई वैशाली साबळे तसेच भाऊ योगेश साबळे यांनी हे पत्र सरकारला लिहिले आहे.
हे पत्र त्यांनी बीड जिल्हाधिकारी यांना लिहिली आहे. या पत्रामध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल मिळवण्याचा उल्लेख करण्यात आले. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये जे पदक विजेते आहेत त्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीप्रमाणे अविनाशला ही मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
अविनाश बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा आहे. त्याची शाळा पाच ते सहा किलोमीटर दूर होती इतर मुले सायकलने ये जा करत, पण आमची परिस्थिती बेताची असल्याने त्याला सायकल घेणे शक्य नव्हते. त्यावेळी अविनाश चालत शाळेत जात असेल अशी आठवण अविनाश च्या वडिलांनी त्याला राष्ट्रकुल स्पर्धेत पथक मिळाल्यानंतर सांगितली होती. अविनाशने शिक्षणासाठी खूप पायपीट केली आहे असं देखील त्याचे वडील म्हणाले.