सासऱ्याने भोळसर मुलगा असल्याचा फायदा घेत सुनेवर केला अत्याचार.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेगळ्या प्रकारचे गुन्हे होताना पाहत असतो. त्याचप्रमाणे कित्येक वेळा नात्याला काळीमा फासला जातो. असाच प्रकार घडला आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये. उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे यामध्ये एका सासऱ्याने त्याच्या सुनेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये त्या पीडित महिलेचा पती भोळसर असल्याने याचाच फायदा सासऱ्याने घेतला आहे. या प्रकरणांमध्ये चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कित्येकदा आपण माणुसकीला काळिमा फासणारे घटना ऐकतो ही घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यात घडली आहे. एका 24 वर्षीय सुनेवर तिच्या सासर्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना शनिवारी समोर आली आहे. यामध्ये वाशी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावामध्ये एक 24 वर्षीय महिला 17 जून च्या दिवशी रात्री आपल्या घरात झोपलेली होती आणि त्याच वेळी त्या महिलेच्या सासर्याने त्या पीडितेचे तोंड दाबून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले तसेच ” जर झालेला प्रकार तू कोणाला सांगितलं, तर तुला जीव मारेल नाहीतर दोन्ही मुलापासून तुला लांब ठेवून तुझी संपूर्ण गावांमध्ये बदनामी करेल. ” अशी धमकी त्या सासऱ्याने पीडित महिलेला दिली. शेवटी त्या पिढीत महिलेने वैतागून वाशी पोलीस ठाणे गाठून यापूर्वीही सासऱ्याने अनेक वेळा अशीच बळजबरी करून धमकी देत लैंगिक अत्याचार केला असल्याचे सांगितले आहे.
पीडित महिलेने आपल्या पतीला बर्याच वेळा सासऱ्याबद्दल सांगितली पण आपला पती हा बोरसर असल्याने काहीच फायदा होत नव्हता. प्रत्येक वेळी पती हा फक्त वडिलांची बाजू घेत होता अशी तक्रार पीडित महिलेने शनिवारी दिलेल्या शनिवारी पोलीस स्टेशन मध्ये दिली. म्हणून पोलिसांनी पती, सासरा, सासू, आजी सासू या चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.