पब्जी गेममुळे थाटलेल्या संसाराला मुलीच्या वडिलांचीच लागली नजर आणि घडले असे काही ! वाचा सविस्तर.
देशभरात खेळला जाणारा नि सर्वांना आवडणारा पब्जी खेळ, या खेळा बद्दल ची ही महत्त्वाची बातमी आहे. पब्जी खेळत असताना एकमेकांचे मित्र होतात, एकमेकांचे जिवलग होतात आणि या खेळातून अनेकदा एकमेकांसोबत चांगले संबंध देखील जोपासले जातात, पब्जी या खेळाला कोरोनाच्या काळात मध्ये जास्तीत जास्त पसंती मिळाली होती.
यामागील कारण की, त्यावेळी लोक डाऊन होतं. कुठेही बाहेर जायचं नव्हतं आणि जो तो आपल्या घरात आपला हा जो वेळ आहे ते कुठे खर्च करायचा म्हणून अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत होते यामध्ये पहिलं प्राधान्य पब्जी खेळायला होता. याच खेळातून अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली. या ऑनलाइन गेम खेळता खेळता मुलगा आणि मुलगी एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यात मैत्री झाली. त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि त्यानंतर त्या दोघांनी लग्न केलं.
लग्नाला एक महिना पूर्ण झाला. दोघांचा संसार आनंदाने सुरू होता. हा सर्व प्रकार घडला तो मध्यप्रदेश मधील रायसेन शहरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये वास्तव्य असलेल्या तरुणांबद्दल. येथे राहणारा तरुण दीड वर्षापूर्वी पब्जी खेळत असताना उत्तराखंडच्या राहणाऱ्या शितल च्या संपर्कात आला. दोघांची मैत्री झाली आणि चॅटिंग सुरू झाले त्यानंतर व्हिडिओ कॉलनी संभाषण सुरू झालं. दोघे एकमेकाला एकदाच भेटले होते.
त्यानंतर त्यांनी एकमेकांसोबत लग्न करायचा निर्णय घेतला. महिनाभरापूर्वी दोघांनी भोपाळ या ठिकाणी लग्न केलं. आणि सोबत राहू लागले. नैनितालमध्ये बीएससीचा अभ्यास करताना शीतलला पबजी खेळण्याची सवय लागली. गेम खेळता खेळता ती योगेशच्या संपर्कात आली. दोन वर्षे दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर शीतल नैनितालहून पळून रायसेनला आली आणि दोघांनी लग्न केलं. कुटुंबियांच्या तक्रारीवरून नैनिताल पोलीस शीतलला नेण्यासाठी आले. मात्र तिनं स्वत:च्या मर्जीनं लग्न केलं असल्याचे तिने सांगितले तसेच मी सज्ञान आहे असं सांगितल्यानंतर पोलिसांना तिच्या शिवाय तिथून जाव लागलं.
ऑनलाईन गेमच्या नादात डोक्यावर परिणाम झाल्याच्या, आत्महत्या केल्याच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील. ऑनलाईन गेमिंगमुळे फसवणूक झाल्याचे प्रकारही तुम्ही वाचले असतील. ऑनलाईन गेमिंगमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. मात्र मध्य प्रदेशातील रायसेनमध्ये याच्या अगदी उलट घडलं आहे. ऑनलाईन गेम खेळता खेळता मुलगा, मुलगी एकमेकांच्या संपर्कात आले. दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर पुढे प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न केलं. आणि त्यांचा या पबजी गेममुळे जुळलेला संसार सुखाचा देखील चालू आहे.