खुशखबर : खाद्यतेल एवढा रुपयांनी झालं स्वस्त.

काही दिवसापूर्वी रशिया आणि यांच्यामध्ये वाद झाले युद्ध झाले आणि या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला बघावे लागले या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव खूप उंच प्रमाणामध्ये वाढले व त्याची टंचाई देखील वाटू लागली इतर देशांची पूर्तता होत नसत त्यामुळे मागणी जास्त व पुरवठा कमी अशी परिस्थिती होती आणि अशा वेळेसच कच्च्या तेलाचे भाव हे गगनाला भिडले होते.
यामध्ये बऱ्याच दिवसानंतर बदल पाहायला मिळाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्या कच्च्या तेलाच्या किमती ३०० – ४०० डॉलरने कमी झाल्या आहेत. कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्यामुळे आपल्यापर्यंत येणाऱ्या तेलाचे भाव देखील कमी होणार आहेत. आणि या सगळ्या फायदा जनतेला मिळावा असा सरकार प्रयत्न करत असतात. येणाऱ्या काही काळामध्ये खाद्य तेलाच्या किमती दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता तज्ञांनी सांगितले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खाद्य तेलाचे भाव कमी होऊन देखील अजून तेल कंपन्यांनी भाव का कमी केले नाही ? असा प्रश्न केंद्र सरकारने तेल कंपन्यांना विचारला आहे आठ दिवसांमध्ये तेलाचे भाव कमी करा अशी सूचना सरकारकडून तेल कंपन्यांना देण्यात आला आहे.खाद्य तेल कंपन्यांना प्रतिलिटर तेलाचे दहा रुपयांपर्यंत दर कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर अन्न सचिव सुधांशू पांडे यांनी ही माहिती दिली आहे.
त्याचबरोबर देशामध्ये एकाच ब्रँडच्या खाद्यतेलाची एमआरपी सामान ठेवण्याची देखील सूचना देण्यात आले आहेत. खाद्यतेल कंपन्यांना ज्या किरकोळ किमती आहेत त्या देखील कमी करण्यासाठी सांगितले आहे. अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालयाने बुधवारी बैठक घेतली होती जगभरात स्वयंपाकाच्या तेलाच्या किमती घसरले असतानाही देशात चढा भाव का ? यासाठी या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली होती सरकारने तेल कंपन्यांना जागतिक किमतीतील कपातीचे फायदे ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.
पांडे म्हणाले होते की, खाद्यतेलाच्या बाजारामध्ये नरमाई चालू आहे कारण आंतरराष्ट्रीय किमतीमध्ये घट झाली आहे आणि सरकारचा वेळीच हस्तक्षेप झाला यामुळे किरकोळ बाजारामध्ये घट आली आहे मात्र गेल्या महिन्यात अनेक खाद्यातील कंपन्यांनी दहा ते पंधरा रुपयांनी प्रति लिटर किमती कमी केल्या होत्या. भारत दरवर्षी आपल्या एकूण खाद्य तेलाच्या गरजेपेक्षा 60 टक्के आयात करत असतो असोसिएशनच्या मते 2020 – 21 च्यादरम्यान खाद्य तेलाची आयात 131.३ लाख टन झाली आहे जी खूपच कमी आहे. त्याचप्रमाणे सरकारने खाद्यतेल कंपन्यांना पॅकेटवर दाखवण्यात आलेल्या वजनापेक्षा कमी तेल असल्याच्या ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत त्याचे निवारण करण्याचे देखील सांगितले आहे. आणि सचिवांनी सर्व खाद्यतेल संघटना व मोठ्या खाद्यतेल कंपन्यांच्या बैठकीत सध्याच्या ट्रेडवर व जागतिक स्तरावर किमतीतील झालेल्या नरमाईचे फायदे ग्राहकांना न देण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. सरकारचे म्हणणे आहे की, गेल्या आठवड्याभरातच जागतिक स्तरावर खाद्यतेलाच्या किमती दहा टक्क्यांनी घट झाली आहे आणि असे असताना याचा फायदा नक्कीच सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आलं.
आणि जर किमती खाद्यतेलाच्या एवढ्या प्रमाणामध्ये कमी झाल्या तर या सगळ्यात जास्त फायदा हा महिलांना होणार आहे. या आधीही काही दिवसापूर्वी खाद्यतेलाच्या दरामध्ये दरात एका लिटर मागे दहा ते पंधरा रुपयांनी कपात केली गेली होती. मध्यंतरी काही देशांनी खाद्यतेलाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. पण आता ही बंदी उठल्यामुळे हे खाद्यतेल बाजारामध्ये भरपूर प्रमाणात आले. आणि त्यामुळे किमतीत घसरल झाली आहे. तसेच दुसरीकडे सोयाबीनचे पीकही बाजारात चांगल्या प्रमाणात आल्यामुळे किमती कमी होण्याची अपेक्षा आहे.
जर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर त्याचा परिणाम हा आपल्याकडे येणाऱ्या पक्क्या तेलावर देखील होतो त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठे मधील जी कच्ची तेलाची बंदी होती ती आता पूर्णतः उठवल्यामुळे आपल्याला खाद्यतेल हे कमी भावामध्ये उपलब्ध होणार आहे.