खुशखबर : शिंदे सरकारकडून पेट्रोल व डिजेल दरामध्ये तब्बल एवढी कपात केली आहे.
आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी हातात येत आहे. महाराष्ट्र राज्य मध्ये एकनाथ शिंदे व फडणवीस यांची सत्ता येताच या सत्तेला पंधरा दिवस उलटत नाहीत, तेच एक खुशखबर सगळ्यांसाठी त्यांनी दिली आहे. बऱ्याच दिवसापासून राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव खूप वाढत चालले होते कुठल्याही प्रकारचे भाव कमी व्हायचे नाव घेत नव्हते. आणि या सगळ्याचा फटका हा सर्वसामान्यांना बसत होता. पेट्रोल आणि डिझेलचे भाव महाग झाल्यामुळे वाहतूक देखील महाग होत चालली होती, पण अशातच आता एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांची सत्ता येतात यांनी राज्यातील पेट्रोल आणि डिझेल स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये एक कॅबिनेट बैठक झाली. आणि या बैठकीदरम्यान काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामधील एक निर्णय म्हणजे राज्यातील पेट्रोल व डिझेलच्या किमती बाबतीत अतिशय महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आला आहे. आणि एकीकडे विजदारामध्ये यामुळे नागरिकांमध्ये सरकारबाबत नाराजीचा सूर पाहायला मिळत होता. आणि तेवढ्यातच दुसरीकडे राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरासंदर्भात जी घोषणा केली आहे त्यामुळे सर्वसामान्यांना आता दिलासा मिळणार आहे. पेट्रोल मध्ये ५ रुपये तर डिझेल मध्ये ३ रुपये प्रति लिटर कमी करण्याचा महत्त्वाचा निर्णय कॅबिनेट बैठकीमध्ये घेण्यात आला आहे.
यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6000 कोटींचा भार पडणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी केल्यामुळे राज्यातील मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन महागाई काहीतरी प्रमाणामध्ये कमी होणार आहे असा अंदाज आहे. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी जी कॅबिनेट बैठक घेतली यामध्ये काही लोक हिताचे महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल दराबाबत घेतलेले निर्णय आणि त्याचबरोबर
या कॅबिनेट बैठकीमध्ये अन्य देखील काही निर्णय घेण्यात आले आहेत ते निर्णय खालील प्रमाणे आपण पाहू.
१. महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या अमृत योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येईल.जलसाठ्यांचे पुनर्जिवन करण्यात येईल. अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 400 निमशहरी भागाचा सामावेश आहेत. या शहरांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा होणार आहे.
२. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन देण्याच्या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल.
३. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगर परिषदेतील नगराध्यक्ष, ग्रामपंचायत मधील सरपंच थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय घेण्यात येईल.
४. बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
५. आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरूंगात राहावं लागलं त्यांना पेन्शन देण्यात येणार आहे. याअंतर्गत सुमारे 3600 लोकशाही स्वातंत्र्य सेनानींना पेन्शन मिळणार आहे.
सत्तेमध्ये शिवसेना व भाजप आल्यानंतर आत्ता काही दिवसांपूर्वी वीज दरामध्ये वाढ केली होती. ही दरवाढ होताच नागरिकांमधून या सरकारवर अनेक प्रकारचा राग जनसामान्यांमध्ये दिसत होता. एकीकडे वीज दरामध्ये वाढ केली होती, पण आता जनसामान्यांच्या हितासाठी म्हणून या सरकारने राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलमध्ये चे दर आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपात केलेली आहे. नक्कीच ही नागरिकांसाठी खुशखबर आहे यामुळे आता राज्यामध्ये थोडं का होईना पण महागाई कमी होणार आहे अशी अपेक्षा जनसामान्य लोक करत आहेत.