एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत घेतला मोठा निर्णय. पहा काय आहे बदल !!
सरकारने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे. विविध शासकीय पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीतर्फे परीक्षा घेतल्या जात असतात. आणि याच प्रक्रियेत पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्याबाबत निर्णय एमपीएससीमार्फत शासनाला शिफारस केली जाते. एमपीएससी 2020 मध्ये परीक्षेसाठी उमेदवारांना दिल्या जाणाऱ्या कमाल संधी बाबत सरकारने मोठा निर्णय घेतलेला, त्यानुसार खुल्या गटातील उमेदवारांना, इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवारांना लागू राहणार नसल्याचे जाहीर केले होते.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीने निर्णय घेतलेला होता मात्र आता त्यात फेरबदल करण्यात आला आहे उमेदवारांच्या कमाल संधीची मर्यादा रद्द करण्यात आली आहे त्यामुळे एमपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता पूर्वीप्रमाणेच प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादा नुसार कितीही वेळा परीक्षा देता येणार आहे.
काय होता या आधीचा नियम ?
उमेदवाराला एमपीएससी ची तयारी करणाऱ्या उमेदवाराला जी मर्यादा दिली होती त्यामध्ये कितीही वेळा परीक्षा देता येत होती त्यामुळे वयाच्या बाबतीतला निकष संपेपर्यंत उमेदवार एमपीएससीची परीक्षा देऊ शकत होता देत होता आणि या परीक्षांमध्ये वारंवार अपयश आले तरी ते पाच वर्षे तयारी करीत.आणि या एमपीएससी परीक्षेसाठी दिल्या जाणाऱ्या संधी बाबत काही ठराविक मर्यादा असाव्यात अशा मागण्या वारंवार होत्या वारंवार होत होत्या आणि या मागण्यांची दखल घेत आयोगाने यूपीएससी च्या धर्तीवर एमपीएससीसाठी जे परीक्षा देत होते त्यांना 2021 पासून कमाल संधीची मर्यादा घालून गेली होती मात्र आता त्यामध्ये बदल होताना आपणास पहावयास मिळत आहे.
आणि यानंतर उमेदवारांकडून भरपूर निवेदने दिली गेली पद भरतीवरील निर्बंधमुळे जे विद्यार्थी परीक्षा देणार होते त्यांच्याकडे असणाऱ्या संधी कमी झाल्या आणि उमेदवारांची यामध्ये नुकसान होताना दिसले आणि नंतर या सर्वांचा अभ्यास करून एमपीएससीच्या आयोगाने एमपीएससी उमेदवारांना त्यांच्या वयोमर्यादा नुसार संधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी दिली.