आत्ताची बातमीगुन्हेगारी

नात्याला काळिमा फासणारी घटना, नराधम बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार.

सोळावर्षीय पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने फुटले बिंग

विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी ….

स्वतःच्याच अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करीत 16 वर्षीय पीडितेस जन्मदात्या पित्यानेच गर्भवती केल्याचा संतापजनक प्रकार उघडीस आला आहे. या प्रकरणी पळासखेडा ता.सोयगाव येथील आरोपी पित्याविरोधात फर्दापुर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी नराधमास ताब्यात घेतले आहे .

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार सोयगाव तालुक्यातील पळसखेडा येथील सोळावर्षीय अल्पवयीन पिडीतेची आई गर्भवती असल्याने माहेरी गेलेली आहे,तर पीडित अल्पवयीन मुलगी व वडील आजी सोबत पळसखेडा येथे राहत होती याचा गैरफायदा घेत आरोपी पित्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केला यातून पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली ही बाब पीडीतेच्या आजीच्या लक्षात आली त्यांनी चौकशी केली असता धक्कादायक प्रकार समजला मात्र त्यानंतरही या बाबीची कुठेही वाचताना करतात त्यांनी पीडित नातीचा गर्भपात करण्याचे ठरवले त्यासाठी आजीने पीडित नातीला जळगाव येथील खाजगी रुग्णालयात गर्भपात करण्यासाठी नेले मात्र गर्भपात करण्यासाठी आलेली मुलगी अल्पवयीन असल्याने डॉक्टरांना शंका आली त्यांनी याबाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणाचे गांभीर्य ओळखून फर्दापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे पो.कॉ. निलेश लोखंडे,प्रदीप कोळी यांच्यासह महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने पीडीतीची भेट घेऊन या प्रकरणातील आरोपीची विचारपूस केले मात्र तिने आरोपीचे नाव सांगण्यास टाळाटाळ केली मात्र पोलिसांच्या पथकाने पीडितेस विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने जन्मदात्या पित्यानेच अत्याचार केल्याचे सांगताच पोलीस पथकाला धक्काच बसला पोलिसांनी तत्काळ पीडितेवर अत्याचार करणाऱ्या ३५ वर्षीय नराधम पित्यास ताब्यात घेतले त्याच्याविरुद्ध फरदापुर पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्यासह पथक करीत आहे

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Back to top button

Share this news instead of copying!