आयुष्य जगायच्या भरपूर व्याख्या आहेत, प्रत्येक जण त्याच आयुष्य हे वेगवेगळ्या पद्धतीने जगत असतो. प्रत्येकाचा दैनंदिन प्रवास हा वेगवेगळा असतो. कोणाचा संपूर्ण दिवस फक्त काम आणि काम करण्यातच जातो. तर कुणाचा संपूर्ण दिवस हा टिंगलटवाळ्या करण्यात जातो. दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळेस पाहतो की, विद्यार्थी देशांमध्ये आपल्याला आपल्या पुढच्या आयुष्याचे मार्ग निवडायचे असतात. आणि यामध्ये आपले भविष्य काय आहे हे आपल्या असणाऱ्या संधीवर ठरते. काही विद्यार्थ्यांचे आयुष्य बाबतचे निर्णय हे ठरलेले नसतात. तर काही शिक्षण घेत असतानाच आपल्याला भविष्यात चांगलं पदाधिकारी बनवायचे असंत.
आपण शिक्षण घेत असताना बऱ्याचदा स्वामी विवेकानंद यांचे विचारही आपल्या कानावर आले असतील. ते म्हणतात की, आपल्याला आपले ध्येय कसं गाठायचं आहे यावर आपले लक्ष हे विचलित होऊ देऊ नका. त्यांनी तरुण पिढीला एक बोध दिला आहे उठा आणि जागे व्हा. थोडक्यात त्यांना असे म्हणायचे असते की आपण रोज तर उठतोच पण त्या उठण्यामागे निश्चित असं काही धोरण नसतं. आणि धोरण नसलेल्या त्या उठण्याला काहीच अर्थ नाही. आपण आपल्या आयुष्यात कोणतेही निर्णय घेत असताना आपल्या अंगातला आळशीपणा अज्ञान अंधश्रद्धा दूर करून आपल्याला नेमके कोणते लक्ष गाठायचे आहे, यावर आपण विचार केला पाहिजे. आपल्याला आपल्या जीवनाची उद्दिष्ट कळले पाहिजे आणि ते कळण्यासाठी आधी स्वतःची ओळख झाली पाहिजे.
आपली ही कथा देखील अशीच आहे. ज्याला आयुष्यामध्ये कधी उणीव भासली नाही त्याला यशाचा महत्व देखील कधीच करणार नाही. बऱ्याचदा लाभ होत नाही तोपर्यंत लोक यश मिळवण्याचा कोणताच उद्देश ठेवत नाहीत. तळमळ हि पाण्यातल्या माशासारखी असावी, तो मासा जसा पाण्यासाठी तळमळत असतो तस आपणही यश मिळवण्यासाठी तळमळत राहिलं पाहिजे. तुमच्या माहिती करता सांगायचे झाले तर यश कधीच गरीब व श्रीमंत असा भेदभाव करत नाही. त्यासाठी पाहिजे फक्त मेहनती व प्रामाणिक अभ्यास करणारा विद्यार्थी. आपल्या देशामध्ये दरवर्षी स्पर्धा परीक्षा होत असतात यामधून हजारो तरुणांची प्रशासकीय सेवेत निवड होत असते. यामध्ये आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की एखादा गरीब मुलगा किंवा मुलगी या परीक्षेत यशस्वी होते त्यापैक बहुतेक हे गरीब कुटुंबाशी निगडित असतात. जेव्हा तुम्ही तुमच्या बांधील झोन मधून बाहेर पडतात, त्यावेळेस तुम्ही तुमचं यश नक्की मिळवतात. आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी खूप मोठ्या किंवा नावाजलेल्या क्लासमध्ये शिक्षण घेतले पाहिजे असे काही नाही. कारण की आपण कितीही क्लास केले तरी शेवटी स्वतःच्या अभ्यासातूनच विद्यार्थी पास होत असतो. अशी ही कहाणी आजची आहे एक आदिवासी मुलगी जिचे वडील मजूर आहेत ती आयएएस अधिकारी झाली आहे
तिचे वडील हे रोजंदारी करणारे मजूर आहेत. दिवसभर काम करून आपला संसार चालवतात या आदिवासी मुलीचे नाव श्री धन्य आहे. ही पोजुथाना गावामध्ये राहणारी आहे हे गाव सर्वात गरीब क्षेत्रांपैकी एक आहे. हे तीन भावंडे असून वडील धनुष्यबाण बाजारात विकण्याचा व्यवसाय करतात व त्यातून मिळालेल्या पैशांमध्ये घर चालवतात. आधी ग्रॅज्युएशन व त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले हे करत असताना तिला आय ए एस अधिकाऱ्याकडून यूपीएससी तयारी करण्याची प्रेरणा मिळाली. आणि तिने स्वतःशी असं ठाम केलं की तिला यूपीएससीचा अभ्यास करून आयएएस अधिकारी व्हायचे आणि त्यानंतर तिने त्या प्रकारे तशी तयारी देखील चालू केली. तिचा पहिला आणि दुसरा प्रयत्न फसला पण तिने हार मानली नाही ती स्वतःला तयार करत होती या सगळ्यांमध्ये तिला अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागला. घरची परिस्थिती गरिबी बिकट असल्यामुळे तिला मुलाखतीला जाण्यासाठी मित्रांकडून पैसे गोळा करून जावं लागत
श्री धन्य दोन वेळेस नापास झाली पण तिने हार मानली नाही उलट तिचा उत्साह आणखी वाढत गेला व तिने जो अभ्यासाचा वेग होता तो देखील आणखी वाढवला आणि याचमुळे तिला तिसऱ्या प्रयत्नात यश मिळाले 2018 मध्ये ती आयएस अधिकारी बनली ४१० क्रमांक मिळवून अधिकारी यादीत आपले नाव नोंदवले तिने परीक्षा उत्तीर्ण करण्याबरोबरच केरळमधील राज्याची पहिली आदिवासी महिला आयएएस अधिकारी हे नाव देखील मिळवले.
श्री धन्य घरच्या परिस्थिती पुढे कधी झोपली नाही ती काय प्रयत्न करत राहिली व मेहनतीच्या जोरावर तिने आधीच संपादन केले आहे आपल्या आई वडिलांचे व समाजाचे नाव रोशन केले आहेत ती तिच्या पालकांचा अभिमान बनले आहे आणि तिच्या यामुळे यूपीएससीची तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांना उत्साह वाढलाय