मंत्र्याचा दिलदारपणा; शेकडो गरीब मुलांना घडवली मॉलची सैर, दिली हवं ते खरेदी करण्याची मुभा.

राजकारणी माणसाला आपण नेहमी ने ठेवतो ,मात्र हाच पुढारी कधी कधी खूप चंगळ काम करतो , सणासुदीला सगळे जण खूप आनंदी असतात , प्रत्येकजण आपल्या कुटुंबाबरोबर आनंदात हा सण साजरा करत आहे. पण प्रत्येकासाठी सण आनंद घेऊन येणारे असतातच अस नाही. अनेक गरीब घरांमध्ये जिथे रोज काय खायचे हा प्रश्न असतो तिथे सणांसाठी खर्च करण्यासाठी पैसे कुठून येणार?
इतर घरातील लहान मुलांप्रमाणे गरीब घरातील मुलांची देखील सण साजरा करण्याची इच्छा होत असेल, पण परिस्थितीपुढे त्यांची इच्छा दरवर्षी अपूर्ण राहत असेल, या मुलांसोबत दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न मंत्री महोदायानी केला.
उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री नंद गोपाल वर्मा यांनी शेकडो गरीब मुलांची दिवाळी आनंदी केली. त्यांनी ६०० हून अधिक गरीब मुलांना मॉलची सफर घडवली, इतकच नाही तर या मुलांना हवी ती शॉपिंग करण्याची मुभा देण्यात आली होती, त्यामुळे या मुलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. पैशांच्या अभावी मॉलमध्ये जाण्याचा केवळ विचार करणाऱ्या या मुलांना प्रत्यक्ष मॉलमध्ये जाऊन हवी ती शॉपिंग करण्याची संधी नंद गोपाल वर्मा यांनी दिली.
नंद गोपाल वर्मा यांनी केलेल्या या मदतीमुळे शेकडो मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि इतरांप्रमाणे त्यांचीही दिवाळी आनंदी झाली. नेटकऱ्यांकडुन नंद गोपाल वर्मा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, समाजातील अशा गरजू व्यक्तींसाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.