लेकराचा मुका घेत पैसे दिले आणि वडिलांनी आयुष्य संपवलं, काळीज पिळवटणारा पत्नीचा हंबरडा.
नेहमी प्रमाणे वडील कामावरून घरी आले , मात्र त्यांच्या मनात काय सुरु होत.याचा अंदाज कोणाला ही आला नाही.
मुलाचा मुका घेतला, त्याला खर्चासाठी पैसेही दिले. तो बाहेर गेल्यानंतर भागवत जाधव यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये ज्या तिघांनी फसवणूक केल्याचा उल्लेख आहे, त्याच तिघांच्या दबावाला कंटाळून भागवत जाधव यांनी आत्महत्या केल्याचा आरोप मयत भागवत जाधव यांच्या मुलांनी केला.
भागवत शामराव जाधव (वय-४८) रा. गणपती मंदीराजवळ, अयोध्यानगर, जळगाव हे आपल्या पत्नी सुनीता, तेजस व योगेश या दोन मुलासंह वास्तव्याला होते. त्यांचे अजिंठा चौक येथे भागवत ट्रान्सपोर्ट नावाने ट्रकच्या माध्यमातून सामानांची ने-आण करत होते. भागवत जाधव यांच्या पत्नी सुनिता बाहेर गेल्या होत्या तर दोन्ही मुले कॉलेजला गेले.
अर्ज भरायचा असल्याने तेजस घरी आला. या दरम्यान भागवत जाधव हे बाहेर गेले व काळी वेळातच परत आले. त्यांनी तेजसचा मुका घेतला, त्याला अर्ज भरण्यासाठी आवश्यक पैसेही दिले. त्यानंतर ते घरात गेले, तर तेजस अर्ज भरायला निघून गेला. त्यानंतर घरी एकट्या असलेल्या भागवत जाधव यांनी घराची दोन्ही दरवाजे बंद करुन घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.