त्यांच्या छातीवर लिहील होत नाव ‘अरुणा’, पाहा कसा सोलापुरातील हत्येचा उलगडा
पत्नीच्या प्रेमप्रकरणात पतीचा बळी गेला , विवाहबाह्य किंवा अनैतिक संबंधाचा असा शेवट झाला. अरुणा नारायणकर व दशरथ नारायणकर या दाम्पत्यास बारा वर्षांची मुलगी आहे. अरुणा हिचे बाबासो बाळशंकर यासोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या अनैतिक संबंधात पती अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी दशरथची गळा चिरून हत्या केली. अनैतिक संबंधाचा शेवट झाला आणि अरुणाने पती गमावला. पती, पत्नी आणि एक मुलगी अशा गोड संसारात तिसऱ्या व्यक्तीचा शिरकाव झाला आणि अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे.
सोलापूर शहरात 21 सप्टेंबर रोजी पहाटे दशरथ नागनाथ नारायणकर नामक व्यक्तीचा खून झाला होता. क्राईम ब्रँचने २४ तासांत या खुनाचा छडा लावत गुन्हा उघडकीस आणला आहे. मयत दशरथची पत्नी अरुणा नारायणकर आणि तिचा प्रियकर बाबासो जालिंदर बाळशंकर या दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांनी संगनमत करुन दशरथ नारायणकर याची गळा चिरुन हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. पत्नी अरुणाने पतीचे डोके धरले, तर प्रियकर बाबासो चाकूने गळा चिरत होता. कट रचून अत्यंत थंड डोक्याने दोघांनी त्याची हत्या केली.
अरुणा हिचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती समोर आली. त्याचा सखोल तपास करत बाबासो बाळशंकर याच्या मोबाईलवर कॉल केला असता त्याचा फोन बंद होता. पोलिसांचा संशय अधिक बळावलाप्रियकर बाबासो बाळशंकर हा सोलापूर शहरात रात्री ११ वाजता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली. पोलिसांनी ताबडतोब मुळेगाव रोडवर सापळा लावला आणि रात्री ११ वाजता त्याला ताब्यात घेतले. त्याचे कपडे काढून तपास सुरू केला असता, बाबासोच्या छातीवर अरुणा नाव गोंदलेले दिसून आले. अरुणा यासोबत तिने पती दशरथ नारायणकर याचा खून केले असल्याची माहिती दिली. खून केल्यानंतर दोघे पळून देखील जाणार होते.