जिवंत रुग्णाला नर्सनं बॉडीबॅगमध्ये भरलं, शवागारात ठेवलं; दुसऱ्या दिवशी पाहिलं तर…
रुग्णालायाच्या बेजबाबदारपणामुळे ५५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. जिवंत रुग्णाला बॉडीबॅगमध्ये भरुन शवागारात ठेवल्याचा आरोप एका रुग्णालयावर झाला आहे. या प्रकरणात रुग्णालयातील कर्मचाऱ्याची चौकशी सुरू केली आहे.
केविन रीड (५५) यांना रॉकिंगघम जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. केविन रीड यांचा मृत्यू झाल्याचं समजून एका नर्सनं त्यांचा मृतदेह बॉडी बॅगमध्ये बंद केला. विशेष म्हणजे रीड यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टरांचं पथक मृतदेहाची तपासणी करण्याासाठी आले, तेव्हा झालेला प्रकार उघडकीस आला
डॉक्टरांनी नर्सकडे मृत्यूचं प्रमाणपत्र मागितलं. मात्र तिला प्रमाणपत्र देता आलं नाही. रुग्णालयातील डॉक्टरांनी रीड यांना मृत घोषित केलंच नव्हतं. त्यामुळे नर्सकडे प्रमाणपत्रच नव्हतं. शवागाराची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांना घडलेला प्रकार लक्षात आला. रुग्ण बहुधा जिवंत होता आणि त्यानं बॉडी बॅगेतून बाहेर पडण्यासाठी धडपड केली, असं तपास पथकातील एका सदस्यानं सांगितलं. रुग्णानं बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपयशी ठरला आणि श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला,
केविन यांनी अवयवदानाची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठीची प्रक्रियादेखील पूर्ण झाली होती. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांचं एक पथक त्यांच्या मृतदेहाची तपासणी करण्यासाठी पोहोचलं,आणि हा सर्व प्रकार उघड झाला.