जिने जन्म दिला, तिनेच पोटच्या मुलीवर 20 वेळा चाकूने वार केला.
अत्यंत धक्कादायक बातमी आहे. एका मुलीवर तिच्या निर्दयी आईने तब्बल 20 वेळा वार केले आहेत.
अत्यंत धक्कादायक अशी बातमी समोर येत आहे गुजरात मधील वडोदरा मध्ये एका निर्दयी आईनेच आपल्या पोटच्या मुलीवर तब्बल २० वेळा चाकूने हल्ला केला आहे.
अचानक पोलीस नियंत्रण कक्षामध्ये एका महिलेचा फोन येतो, आणि ती महिला त्यांना सांगते की, माझ्याकडून माझ्या मुलीची हत्या केली गेली आहे. आणि त्या महिलेचा फोन आल्यानंतर पोलिसांनी त्या महिलेच्या निवासस्थानी जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली असता, त्या महिलेने तिची 13 वर्षीय मुलगीवर चाकूने वार करून तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. त्या महिलेचा फोन नंतर जेव्हा पोलीस घरी पोहोचतात तेव्हा त्यांना लक्षात येते की मुलगी अजून जिवंत आहे. आणि त्या मुलीच्या शरीरावर बऱ्याच ठिकाणी जखमांच्या खुणा देखील दिसल्या. कसलाही विचार न करता पोलिसांनी त्या मुलीला तात्काळ रुग्णालयांमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि तिच्यावर उपचार करण्याचे आदेश देखील दिले. सध्या त्या मुलीची प्रकृती स्थिर आहे असे डॉक्टरांनी देखील सांगितले आहे.
एक आई जी आपल्या मुलाला किंवा मुलीला नऊ महिने स्वतःच्या पोटामध्ये तळहाताच्या फोडासारखे जपत असते आणि त्याच मुलीवर जेव्हा वार करायची वेळ येते तेव्हा ती आई हे कसे विसरून जाऊ शकते असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. या निर्दयी आईनं त्या मुलीच्या मानेवर व शरीराच्या इतर अवयवांवर जवळजवळ २० वेळा वार केलेले आहेत आणि त्यामध्ये बहुतांश जखमा ओरखडल्या सारख्याच दिसत होत्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितलं.
पोलिसांनी जेव्हा त्या आईला विचारले की तू त्या मुलीवर हल्ला का केला ? त्या निर्दयी आईने सांगितले की माझे आणि माझ्या मुलीचे कायम वाद होतात ती घरकामात मला मदत करत नाही आणि मला उद्धटपणे बोलत असते आणि याच कारणावरून मंगळवारी आमचे दोघांमध्ये वाद होतात आणि माझ्या रागाचा संयम सुटतो आणि मी रागाच्या भरात येऊन तिच्यावर चाकूने वार केले.
त्यानंतर पोलिसांनी असे सांगितले की, ती महिला 39 वर्षे असून ती घटस्फोटित आहे ती आपल्या मुलीचं एकटीच संगोपन करत असून इंटरनेटवर तिचे व्हिडिओ अपलोड करुन ती काही पैसे कमावते आणि तिची मुलगी ही त्या शहरातील एका खाजगी शाळेत आठवीत शिकते. पोलिसांनी सांगितले की, सदरच्या महिलेने तिच्या मुलीला जे जखमी केले आहेत यावरून असे दिसते की त्या आईला तिच्या मुलीला मारायचे नव्हतं.
सध्याच्या मुलीवर उपचार चालू आहे आणि ती मुलगी जेव्हा बोलू शकेल तेव्हा आम्ही त्या मुलीची बाजू देखील समजून घेउ असा हल्ला झाला आहे त्यामागे आणखी काही कारण तर नाही ना ते शोधण्याचा प्रयत्न आम्ही नक्की करू असं पोलीस अधिकारी म्हणाल्या. त्या मुलीवर सध्या उपचार चालू असून शहरांमध्ये कोणतेही नातेवाईक नसल्याने पोलिसांनी अद्याप पर्यंत कुठलीही तक्रार दाखल केलेली नाही.