ठाकरेंच्या त्या जेष्ठ नेत्याच्या अटकेची शक्यता; मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द वापरणे भोवले
दसरा मेळावा झाल्यापासून दोन्ही गट एकमेकावर टीका करत आहेत , त्यातच आता चिन्ह हि गोठवल गेल आहे . या घडी ची एक मोठी बातमी समोर येते औरंगाबादचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे, मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्ध वापरणे ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरेंना भोवले आहे. चंद्रकांत खैरेयांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांच्या फिर्यादिवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात एका वाहिनीवर चर्चा करत असतांना खैरे यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप आहे.
काय म्हणाले खैंरे?
शिवसेनेने अनेकांना मोठे केले, ग्रामपंचायत संदस्य ते खासदार बनवले, आणि आता या लोकांनी शिवसेना सोडली, शिवसेना फाडण्याचे पाप या गद्दारांनी केले आहे. जर दिघे आता असते तर त्यांनी शिंदेंना उलट टागले असते असा दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. दिघे साहेबांच्या नावावर हे सगळं सुरू असले तरी ते वरतून पाहत असतील की बाळासाहेबांची शिवसेना यांनी फोडली असे त्यांना वाटत असेल.
एकनाथ शिंदे एक साधा रिक्षावाला माणूस. त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? आनंद दिघे असते तर त्यांनी या शिंदेंना उलटे टांगले असते, अशा तिखट शब्दांत शिवसेना नेते चंद्रकात खैरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे व गद्दारांनी शिवसेना फोडली. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतर शिंदे व भाजप कुठेही दिसणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.