ट्रेन हुकल्याचे सांगून बुक केली होती रूम, लॉज मध्ये नको त्या अवस्थेत सापडले प्रेमी युगल.
कोणत्या वेळी आपल्या सोबत काही गोष्ट घडेल याचा काही नेम नसतो. आपण उद्याच ठरवलेलं नियोजन पूर्ण करू शकेल की नाही याची देखील शंका असते. बातमीमध्ये एक मुलगा आणि एक मुलगी यांना दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता ट्रेनने दिल्लीला जायचे असते. आधीच्या दिवशी जाणारी ट्रेन हुकल्यामुळे ते एका लॉज वरती राहण्याचे नियोजन करतात. आणि आज सुटलेली ट्रेन आपण उद्या ट्रेन ने दिल्ली जाऊ असं सांगून ते लॉजवर मुक्कामाला थांबतात. बुक करतेवेळेस मंगळवारी सकाळी साडे आठ वाजताची श्रमजीवी ट्रेन पकडायची आहे असं मुलाने सांगून रूम बुक केली. आणि त्या दिवशी रात्री ते दोघे जण त्या ठिकाणी मुक्कामी राहिले.
पण दुसऱ्या दिवशी या हॉटेलच्या खोलीत या दोघांचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. एका सोबत दोन मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरामध्ये खळबळ माजली आणि हॉटेलमध्ये झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. हे सदरील तरुण आणि तरुणी काशी चेक पोलीस स्टेशन हद्दीत मधेपुर गावातील रहिवासी आहेत. यामध्ये त्या तरुणाचे नाव रॉकी वय २० आणि तरुणीचे नाव सोनम वय १७ अशी नावे आहेत. हे मृतदेह मधील तरुणी ही पश्चिम बंगालच्या वर्धमान येथे राहून शिक्षण घेत होती.
सकाळी गच्चीवर झाडांना पाणी देत असताना शेजारच्या खोलीत राहणाऱ्या मुलाने शेजारच्या खोलीत दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली. आणि यावेळी त्यांनी खोली उडायचा प्रयत्न केला असता तेव्हा दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही आतून कोणीही कसला प्रतिसाद देत नसल्यामुळे या खोलीचे कुलूप तोडून आत मध्ये जावं लागलं. आत मध्ये गेल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला या खोलीमध्ये दोघेही मृतावस्थेत पडलेले होते. आणि ही घटना पाहताच याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. यामधील तरुण आणि तरुणी या दोघांच्याही कुटुंबीयांना फोन करून याबाबतची माहिती दिली आहे.
तरुणी पश्चिम बंगालचे वर्धमान जिल्ह्यातील मध्यपुर हायस्कूलमध्ये शिकत होती. ७ जुलै पासून बेपत्ता असल्याची तक्रार स्थानिक पोलिस ठाण्यांमध्ये दाखल केली गेली होती. पोलीस नातेवाईकांच्या येण्याची वाट पाहत आहेत. नातेवाईक आल्यानंतर संपूर्ण प्रकरण काय आहे हे स्पष्ट होईल. सध्या या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय मध्ये पाठवण्यात आले आहे. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण काय आहे हे स्पष्ट होणार आहे.