बेपत्ता डॉक्टरचा शोध लागला, अश्या अवस्थेत होता मृतदेह.
आपण देशांमध्ये अनेक ठिकाणी आत्महत्येच्या घटना पाहत असतो. यामध्ये अगदी श्रीमंता पासून ते गरिबांपर्यंत लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणी ना कोणी मानसिक आजारांचा सामना करत असतात. आणि मग कधीकधी या आजाराला या दुखण्याला वैतागून आपला आयुष्य संपवून टाकायचा निर्णय तरुण-तरुणी घेत असतात. पण तसे पाहिले तर आपल्या अडीअडचणींवर किंवा आपल्या आजारांवर आत्महत्या हा पर्याय असू शकत नाही. कारण यावर उपाय म्हणजे आजारांवर उपचार घेणे.
कित्येक वेळा दैनंदिन आयुष्यात सामना करावा लागल्याने, तणाव सहन न झाल्याने बरेच जण आत्महत्या सारखा पाऊल उचलतात. अशीच एक घटना कोल्हापूर या ठिकाणी घडली आहे. एक उच्चशिक्षित तरुणी डॉक्टर पदवी घेतलेली अशा तरुणीने भुलीचे इंजेक्शन घेऊन स्वतःचं आयुष्य संपवल आहे. डॉक्टरला आपण देवासमान समजत असतो पण ज्यावेळेस असा देवमाणूस आत्महत्या करतो तेव्हा त्याचे कारण देखील तसेच असणार. लोकांचा जीव वाचवणारा डॉक्टर आत्महत्या करतो या वृत्ताने सगळीकडे खळबळ उडाली आहे.
आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचे नाव अपूर्वा असे आहे. प्रसिद्ध डॉक्टर प्रवीण हेंद्रे यांची कन्या आहे. सकाळच्या सुमारास ताराबाई पार्क जवळ डी मार्टच्या समोर बेशुद्ध अवस्थेमध्ये सापडली होती. तिला जेव्हा उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेव्हा उपचारादरम्यान निधन झालं. शनिवारच्या रात्री ती मित्रांसोबत पार्टी करून घरी आली होती पहाटेच्या सुमारास ती घरातून कोणाला न सांगता बाहेर पडली आणि सकाळी जेव्हा तिची शोधाशोध केली तेव्हा ती कुठेही दिसत नसल्याने वडिलांनी शाहूपुरी पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांना मिळालेल्या आत्महत्या वरून पोलीस वडिलांना घेऊन घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळेस बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती तिथे विरेनियम इंजेक्शनची बाटली आणि सिरींज आढळून आली. इंजेक्शनची अधिक मात्रा घेऊन तिने जीवन संपवल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र एक डॉक्टर तरुण तिचं आयुष्य संपवते आत्महत्या करते असं भयंकर पाऊल एक डॉक्टर तरुणी का उचलते याबाबतचा तपास पोलीस अधिकारी करत आहेत.