निर्लज्ज प्रशासनामुळे पहा या बापाला चिमुकल्यासाठी काय करावे लागले.

गेल्या बरेच दिवसांपासून राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आणि या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. बऱ्याच ठिकाणी पुराचे पाणी आले आहे. नदी-नाल्यांना पुराचे स्वरूप आल्यामुळे बऱ्याच या गावांचे शहरांसोबत किंवा इतर गावांत सोबती संपर्क तुटला आहे. आणि त्यामुळे जनजीवन हे बर्यापैकी विस्कळित झाले आहे. आणि यामुळे पुराचा फटका गावकऱ्यांना किंवा शहरातल्या लोकांना पडत आहे. रस्त्यावर पुराचे पाणी आल्यामुळे वाहतूक देखील ठप्प झाली आहे. गावाकडील भाजीपाला, दूध किंवा इतर गरजा या गावाकडून शहराकडे येत असतात या सध्या थांबले आहेत. त्यामुळे बऱ्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. बरेच खेड्यापाड्यात जे दवाखाने आहेत त्या दवाखान्यामध्ये डॉक्टर हे शहरातून येत असतात. पण पावसामुळे रस्त्यावर देखील पाणी साचले आहे. आणि त्यामुळे प्रवास देखील थांबला आहे. आणि अशातच एक घटना घडली आहे.
एका गावामध्ये एक मुलगा तापाने फणफणत असतो. नदी नाल्यांमध्ये पुराचे स्वरूप असल्यामुळे प्रशासनाकडून पाण्यात जाऊ नका असं सांगितलं जात आहे. पण आपल्या मुलाला ताप आला आहे म्हणून हा बाप जीवाची बाजी लावून पुराच्या पाण्यात जाऊन तो नदी पार करतो आणि तसाच परतही माघारी येतो. ही घटना चंद्रपूर मधील आहे आणि याचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या गावातील एक छोटा मुलगा तापाने फणफणत होता. आणि म्हणून या चिमुकल्या मुलाला घेऊन बाप नदीच्या पुरात शिरला व त्याला उपचारासाठी घेऊन गेला आणि उपचार करून पुन्हा ती नदी पार करत घरी परतला.
गोंडपिपरी तालुक्यातील रहिवासी असलेल्या शामराव यांच्यावर ही वेळ आली. पण अशी परिस्थिती असतानाही हा बाप उभा राहिला त्यांच्या गावांमध्ये नीट आरोग्य सुविधा नाहीत. त्यात नदी-नाल्यांना पूर आला आहे आणि अशातच मुलगा आजारी असल्यामुळे बापाने मुलाला खांद्यावर घेत पुरात पाय ठेवला आणि या पुरातून पायी मार्ग काढत मुलाला उपचार करण्यासाठी म्हणून दुसऱ्या गावाला घेऊन गेला. बाप म्हणाले कि सर्पूर्ण घराची जबाबदारी आली आणि घरातील कोणी पण सदस्य असू पुरुष मंडळीना जबादारी घ्यावीच लागते. त्यात हा घरातला लहान मुलगा आहे त्यामुळे कोणतीच रिस्क न घेता त्या बापाने मुलासाठी हे पावूल उचलले आणि स्वतच्या मुलाचा दुसऱ्या गावात मध्ये जावून उपचार करून आणला.
या बापाच्या कार्याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. अश्या बातम्या सरकारच्या कानावर येत असून देखील सरकार कोणचे पण असून प्रशासन यामध्ये दिरंगाई करताना आपण पाहतो.