एका लॉन्ड्रीचालकाचा मुलगा बनला खो-खो मध्ये मुंबईचा आधार.पहा बातमी सविस्तर.
आपल्या अवतीभवती काय आहे ? यातून आपण काय शिकला पाहिजे ? आपली स्वप्न, आपले ध्येय हे मोठे असले पाहिजेत. मग परिस्थिती बेताची जरी असली तरी आपण त्यावर ती नक्कीच विजय मिळू शकतो.
ही बातमी आहे पुण्यातील, पुण्यातून एका खेळाडू बद्दलची ही बातमी आहे. मुलगा मुंबईचा आधार बनला. खेळामध्ये त्यांन भरारी घेतली आहे. कॉमनवेल्थ गेम्स या स्पर्धेचा थरार अनुभवल्यानंतर क्रीडा प्रेमींना खेळाचे वेध लागले आहेत. पुण्यातील बालेवाडी स्टेडियम मध्ये अल्टिमेट खेळाचा पहिला सिझन सुरू होणार आहे. या लीगमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मुंबई खिलाडीज टीम करणार आहे. मुंबईची टीम विजेतेपदाची प्रबळ दावेदार समजले जाते. या टीममध्ये रोजच्या आयुष्यात गरिबी अनुभवलेल्या खेळाडूंचा समावेश आहे.
मुंबईचा विजय हजारे हा पान टपरी चालकाचा मुलगा आहे, तर मुंबईच्या टीमचा प्रमुख आधारस्तंभ असलेला मिलिंद कुरपे हा लॉन्ड्रीचालकाचा मुलगा आहे. त्याला या खेलासाठीचे बाळकडू हे त्याच्या आईकडून मिळाले आहे. त्याची आई शाळेत असताना खो खो खेळायची पण पुढे काही वैयक्तिक आणि कौटुंबिक कारणामुळे आईने खो खो खेळणे सोडले. तो बोलताना सांगतो कि, आईमुळेच त्याला खेळाची आवड निर्माण झाली.
आईबरोबरच वडिलांनी देखील आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केलं. यासाठी पाठिंबा देखील दिला असं मिलिंद सांगतो. आपणही शिक्षणावर लक्ष केंद्रित करा व शिक्षण पूर्ण केल्यानंतर या गोष्टी कराव्यात. सुरुवातीच्या काळात आपण शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शिक्षण पूर्ण करावं अशी घरच्यांची इच्छा होती, मात्र त्याच्यामध्ये होणारे दिवसेंदिवस ती प्रगती पाहिली आणि त्यानंतर घरच्यांची इच्छा मात्र बदलली.
मिलिंदनं खो-खोमधील वेगवेगळ्या पातळीवर स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यानं यापूर्वी खेलो इंडिया युथ गेम्समध्ये गोल्ड मेडल मिळवलंय. त्याचबरोबर वरिष्ठ पातळीवरी राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत सिल्व्हर मेडल पटकावले आहे. मिलिंदचा हा अनुभव मुंबई खिलाडीजला या स्पर्धेत उपयोगी ठरणार आहे. टीमचा आधारस्तंभ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे.