त्या तिघी आई सोबत कपडे धुवायला गेल्या, पण पुन्हा परतल्याच नाही. पहा त्यांच्यासोबत काय घडल..
जत तालुक्यातील बिळुर येथील सुनीता माळी या कपडे धुण्यासाठी मुलींसह गावाजवळील तलाव परिसरात गेल्या होत्या. तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाटा जवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तीन मुली बेपत्ता होत्या. दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाहीत. त्यांनी सासरवाडी कोहळी येथेही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.
निता तुकाराम माळी (वय २७), अमृता तुकाराम माळी (वय १३), अंकिता तुकाराम माळी (वय १०), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय ७) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत रात्री उशीरा या चौघींचेही मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले.सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर येथे तलावाकाठी कपडे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या घटनेबद्दल बिळुर भागात उलट सुलट चर्चा सुरू होती. तपास जत पोलीस करत आहेत.तीन लहानग्या मुलींसह आईचा मृतदेह तलावामध्ये आढळून आल्याने या परिसरात मोठी खळबळ उडालीआहे. हा अपघात आहे की घातपात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. या घटनेने बिळूर आणि जत तालुक्यात शोककळा पसरली आहे.
या अश्या पद्धतीने एकाच वेळेस आई सोबत मुलीं बुडाल्या असल्याने, एकाच वेळी या चौघीचा मृत्यू होण हा घातपात तर नाही ना, याचा तपास पोलीस करत आहेत .