गाव तसं चांगलं; 39 वर्षांपासून लोकांनी कोर्ट पोलीस स्टेशन कधी पाहिलेच नाही.
खेड्यांमध्ये पोलीस स्टेशन म्हटलं की अंगावर काटा यायचा ही परिस्थिती पूर्वी होती मात्र अशीच काहीतरी परिस्थिती एका गावामध्ये उद्भवली आहे कारण तब्बल 39 वर्षापासून या गावातील गावकरी पोलीस स्टेशन कडे फिरकलेच नाहीत तुम्ही म्हणाल की सध्या वातावरण अत्यंत दूषित आहे देशातला असो किंवा महाराष्ट्रातला असो अनेक वादविवाद घडत असतात अनेक प्रकरणे पुढे येत असतात ED सारख्या या गोष्टी तर महाराष्ट्रात हैदोस घातला आहे मात्र या गावातील माणसं कुठलाही पोलीस स्टेशन ला व कुठलाही कोर्टात तब्बल 39 वर्षापासून गेलेच नाहीयेत त्यामुळे या गावाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. पोलीस स्टेशन सर्व गावकऱ्यांना सहकार्य करत वेगळ्या पद्धतीने काही योजना राबवत या गावाला पोलीस पोलीस स्टेशन पासून लांब ठेवले पोलीस 24 तास काम करत असतो मात्र या गावातील लोकांनी पोलिसांनाच विश्रांती दिली आहे, कारण की कुठलेही वादविवाद न झाल्यामुळे आणि सर्व गावांमध्ये शांतता असल्यामुळे सर्व गुण्यागोविंदाने राहत असल्यामुळे या गावातील मंडळी गेल्या ३९ वर्षापासून पोलीस स्टेशन कडे गेलेच नाही येत.
पोलीस ठाण्यात 39 वर्षांमध्ये या गावात किंवा गावातल्या एखाद्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला नाही आणि गावातले लोक सुद्धा कोर्टकचेरी किंवा पोलीस स्टेशन या गोष्टींपासून लांबच राहतात या गावांमध्ये कोणताही वाद होत नाही असे या गावातले अनेक ज्येष्ठ व तरुण लोक सांगतात जर किरकोळ वाद कधी झालेच तर ते गावातली ज्येष्ठ मंडळी पंचायत स्तरावर परस्परसंमतीने मिटवून देखील घेतात त्यामुळे या गावातील लोकांना पोलीस स्टेशनला कधी जावेच लागले नाही ओरछा या धार्मिक व पर्यटन शहराजवळ असलेले हाथीवर खिरक हे गाव आहे या गावातल्या लोकांना गेली 39 वर्ष म्हणजेच 1983 पासून कोर्टकचेरी आणि पोलीस हे माहीतच नाही.
या गावांमध्ये पाल व अहिर पवार ब्राह्मण समाजाचे लोक राहतात आणि ही लोकं एकमेकांसोबत मिळून मिसळून परस्पर बंधुभावने राहतात व एकमेकांच्या सुख दुःखा मध्ये नेहमी एकमेकांना साथ देखील देत असतात आणि जर कधी या समाजातील लोकांमध्ये दुरावा वाद अशी काही परिस्थिती निर्माण झाली तर या गावातली जेष्ठ मंडळी आहे यामध्ये मध्यस्थी करून किंवा यांची समजूत घालून शांतता निर्माण करतात. या गावांमध्ये राहणाऱ्या लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती करण्यासोबतच शेळी पालन गाय पालन यासारखे पाळीव प्राणी पाळणे हा देखील आहे शेळीपालना मुळे त्यांना रोजगार उपलब्ध होतो व आर्थिक उत्पन्नही मिळत असते आणि गोपालनामुळे या गावातील लोकांना दुधाची कधी कमतरता भासत नाही. गाईच्या दुधापासून या गावातली लोक दुधाचा व्यवसाय करतात तुपाचा व्यवसाय करतात अशाप्रकारे पाळीव प्राणी संगोपन व त्यासोबत शेतीची जोड असा मिळून हे लोक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात
खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात असे अनेक गावात तयार व्हावेत ज्या ठिकाणी पोलिस स्टेशनला कोणीही जाऊ नये कारण प्रत्येक गावांमध्ये शांतता नांदावी प्रत्येक गावेही सुजलाम सुफलाम याच साठी तर सर्वजण प्रयत्न करत असतात मात्र ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहे त्या ठिकाणी पोलिसांनी सतर्कतेने आणि जागरूक राहून लोकांची मदत करणं हे देखील तितकाच महत्त्वाचा आहे मानाचा मुजरा