काम झाले दमदार कारण कर्तव्य दक्ष आहेत सोयगावचे तहसीलदार!

विजय चौधरी- सोयगाव तालुका
सोयगाव,दि.०१…बहुलखेडा ता.सोयगाव येथील पाझर तलावाजवळील शेतकऱ्यांचा शेतीकडे जाणारा रस्ता जलसंधारण विभागाच्या ठेकेदाराने पाझर तलावाच्या भिंतीच्या कामामुळे बंद करून टाकला होता.सदरील रस्ता तहसीलदार रमेश जसवंत यांनी तक्रार प्राप्त होताच अवघ्या तीन दिवसात शेतकऱ्यांना पर्यायी रस्ता करून दिल्याने शेतकऱ्यांना आता शेतात जाण्यासाठी पाझर तलावाजवळून पर्यायी हक्काचा रस्ता मिळाला आहे.शुक्रवारी पाच तासांच्या कार्यवाहीत तलाठी शीला मोरे यांनी घटनास्थळी तळ ठोकून अखेरीस तात्पुरता कच्चा रस्ता तयार करून दिला आहे.
बहुलखेडा ता.सोयगाव गावाजवळील पाझर तलावावरून शेताकडे जाण्यासाठीचा रस्ता बंद करण्यात आला होता त्यासाठी बहुलखेड्यातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी दि,२७ जून पासून संघर्ष सुरु केला होता तहसीलदार रमेश जसवंत,मंडळ अधिकारी मारोती धोंडकर यांच्या पथकांनी दि.२९ जून ला रस्त्याची पाहणी करून अखेरीस खरिपाच्या हंगामापुरता वापरासाठी कच्चा रस्ता शुक्रवारी महसूल विभागाने तयार करून दिल्याने अखेरीस बहुलखेड्यातील दोनशे शेतकऱ्यांची शेताची वाट मोकळी झाली आहे.यामध्ये तहसीलदार रमेश जसवंत यांच्या कल्पकतेतून कच्चा तात्पुरता रस्ता तयार्कारण्यात आला आहे.तलाठी शीला मोरे यांनी शुक्रवारी तब्बल पाच तासांच्या अथक मोहीम राबवून हा रस्ता तयार करून घेतला आहे.त्यामुळे शेताचा साठी रस्ताच बंद झालेल्या दोनशे शेतकऱ्यांनी अखेरीस सुटकेचा श्वास घेतला आहे.
—–तीनच दिवसात महसूलची कारवाई—-
तहसीलदार रमेश जसवंत,मंडळ अधिकारी मारोती धोंडकर,तलाठी शीला मोरे यांच्या पथकाने दि.२९ पाझर तलावाच्या भीतीची पाहणी करून भिंती खालून रस्ता तयार करण्याचे नियोजन केले या नियोजनानुसार शुक्रवारी कच्चा रस्ता तयार करून अवघी तीनच दिवसात शेतकऱ्यांची शेतावर जाण्याची कसरत बंद केली आहे.