नाश्ता सेंटरच्या मागे सुरू होत नको तसलं काम, पुढे काय घडलं पाहा बातमी सविस्तर.
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील हॉटेल प्रसादच्या लगत नाश्ता सेंटरच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून एकाविरुध्द गुन्हा दाखल करून दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली आहे.
नगर ते मनमाड मार्गावरील कोल्हार खुर्द गावचे शिवारातील हॉटेल न्यू प्रसाद लगत असलेल्या अपना नाष्टा सेन्टर पञ्याचे शेड पाठीमागे असणारे पत्राच्या खोल्यामध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मेघःशाम डांगे यांना मिळाली त्यानुसार आज पहाटे छापा टाकुन एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली असुन त्यामधील एक पिडीत महिला परराज्यातील आहे. या कारवाईत २०००/- रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे.आरोपी वसंत रघुनाथ लोंढे रा. कोल्हार खुर्द यास ताब्यात घेवुन राहुरी पोलीस स्टेशन येथे मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा १९५९ चे कलम ३,४,५,७,८ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. मेघःशाम डांगे, पोसई निरज बोकील, पोना विकास साळवे, पो. कॉ. सचिन ताजने, पो. कॉ. नदिम शेख, मंजुश्री गुंजाळ, जालींदर साखरे, पोको रोहित पालवे, पो. कॉ. आजिनाथ पाखरे आदींनी ही कारवाई केली