ब्रा घालून म्युझियममध्ये प्रवेश करत होती यू-ट्यूबर, पोलिस आले अन्…
एखाद्या ठिकाणी जाताना योग्य तो पोषाख करावा, नाही तर ते असभ्य दिसतं आणि त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. या गोष्टीचा अनुभव सध्या सोशल मीडियावरच्या एका कंटेंट क्रिएटरला आला आहे. तैवानची सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आणि यू-ट्यूबर आयरीस हेसिये ही पॅरिसच्या एका संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेली असताना तिनं चक्क ब्रा घालून फोटो शूट केलं आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं. त्याच वेशात ती संग्रहालयात जाण्याचा प्रयत्न करत असताना फ्रान्सच्या पोलिसांनी तिला तिथून हाकलून लावलं.
सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू, ती नुकतीच फ्रान्समध्ये फिरायला गेली होती. तिथलं ल्युव्र म्युझियम पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे. त्या संग्रहालयाच्या बाहेर अनेक जण फोटो काढतात. तसाच फोटो तिनंही काढला; मात्र त्यासाठी तिनं जे कपडे घातले होते, ते आक्षेपार्ह होते. फोटो काढण्याआधी तिनं काळ्या रंगाचा ओव्हरकोट घातला होता;
मात्र थंडी असूनही तिनं तो कोट काढला आणि ब्रा घालून फोटोशूट केलं.हे फोटो आणि व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले; मात्र पोलिस तिथे आले आणि तिला तिथून काढता पाय घ्यावा लागला. त्याबाबतही तिनं सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यावर काही जणांनी तिच्या बाजूने, तर अनेकांनी तिच्या आक्षेपार्ह कपड्यांविषयी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
फ्रान्स हा देश फॅशनबाबत खूप पुरोगामी आहे. असं असलं तरी सार्वजनिक ठिकाणी पोशाखाचे नियम पाळावेच लागतात. तैवानच्या यू-ट्यूबरला हाच अनुभव आला. पोलिसांनी तिला तिथून हाकलून दिलं. तशाच प्रकारच्या पोशाखात तिला संग्रहालयात जायचं होतं; मात्र पोलिसांनी तिचा बेत उधळून लावला. तिच्या या पोस्टची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होते आहे.