सोयगाव-जरंडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे झालेले असून या रस्त्याची संबंधित विभागाकडून पाच वर्षात अद्यापही डागडुजी नाही.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव-जरंडी रस्त्यावर मोठमोठे खड्डे झालेले असून या रस्त्याची संबंधित विभागाकडून पाच वर्षात अद्यापही डागडुजी करण्यात आलेली नाही सोयगाव शहरापासून खड्डे मय रस्ते सुरू होत असून शहरातून च या रस्त्यावर प्रवास करतांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.दरम्यान सोयगाव च्या गवळण नाल्या वर या रस्त्यावर वळण रस्ता असून संबंधित विभागाकडून दिशादर्शक फलक लावण्यात आलेले नाही त्यामुळे गवळण नाल्या वरील रस्ता धोक्याचा वळण रस्ता झालेला आहे
सोयगाव शहरापासून ते गवळण नाल्या पर्यंतच्या रस्त्यावर खड्डेच खड्डे झालेले असून यावर अद्याप डागडुजी करण्यात आलेली नसून गवळण नाल्या वर या रस्त्याच्या दुतर्फा साईड पट्टे तयार करण्यात आलेले नसून या वळण रस्त्यावर धोकादायक बाजू झाल्या आहेत त्यामुळे वाहनधारक रस्त्यावरील पुलाच्या खाली कोसळण्याची भीती झालेली आहे याबाबत प्रहार क्रांती अपंग चे तालुकाध्यक्ष संदीप इंगळे संबंधित ठेकेदार व सार्वजनिक विभागावर सोयगाव पोलिसात गुन्हा दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.