शेती मालाला व दुधाला भाव नाही. शेतकरी हिताचा एक ही निर्णय नाही.

शेवगाव- शेती मालाला व दुधाला भाव नाही. शेतकरी हिताचा एक ही निर्णय नाही. शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींचे अजिबात योगदान नाही. त्यामुळे ते केवळ दिशाभुल करुन मते मागतात. आताच त्यांनी त्यांचा पराभव मान्य केला असून वेगवेगळे युक्ता शोधण्याचा अटापिटा या निवडणुकीत सुरु आहे. शेतीमाला भाव मिळवून देण्यासाठी, या भागातील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तसेच यासह विविध प्रश्न सोडविण्यासाठी या निवडणुकीत मला मोठया मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन आमदार नीलेश लंके यांनी मतदारांना केले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगाव तालुक्यातील २३ गावांमध्ये लंके यांच्यासह पदाधिका-यांनी आज मंगळवार ता.३० रोजी गावभेट दौ-याचे आयोज केले. या गावभेट दौ-यामध्ये उमेदवार नीलेश लंके यांच्यासह शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, रामभाऊ गोल्हार, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) तालुकाध्यक्ष हरीश भारदे, शिवशंकर राजळे, शिवसेना तालुकाप्रमुख अँड. अविनाश मगरे, माधव काटे, बाजार समितीचे संचालक राजेंद्र दौंड, वजीर पठाण, काँ. संजय नांगरे, इजाज काझी, शंकर काटे, सुनिल रासने, शिरष काळे, माऊली निमसे, संपत मगर, बंटी म्हस्के आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार नीलेश लंके यांच्या घावभेट दौ-यास खरडगाव येथून सकाळी ८.३० वाजता सुरुवात झाली. त्यानंतर आखेगाव,वाडगाव, थाटे, हसनापूर, कोळगाव, मंगरुळ बुदु्रुक, आंतरावील बुद्रुक, शिंगोरी, राणेगाव, गोळेगाव, सुकळी, गायकवाड जळगाव, ठाकुर पिंपळगाव, प्रभुवाडगाव, खामपिंप्री, खडका, दहिगांव शे, गदेवाडी, सोनेसांगवी, राक्षी ठाकुर निमगाव, माळेगाव आदी ठिकाणी लंके यांनी गावभैट दौरा काढून महिला व नागरिकांशी संवाद साधला. सर्व गावांमध्ये आमदार लंके यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. नागरिकांचा उत्सफुर्त प्रतिसाद पाहून लंके ही भारावून गेले. या गावभेट दौ-यामध्ये लंके यांनी शेतीमध्ये काम करणारे शेतकरी, मजूर यांच्याशी संवाद साधून त्यांचे विविध प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.