हात नाही तरी पायांनी देतोय १२वी ची परीक्षा, अक्षर पाहून सर्वसामान्यांनाही वाटेल लाज.
आपली इच्छाशक्ती जर मोठी असेल तर अशक्य गोष्टी ही आपण शक्य करू शकतो, कारण हाताने नाही तर पायाने एक विद्यार्थी बारावीची परीक्षा देतोय, यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र तसं घडलं आहे. कारण या मुलांना बारावीच्या परीक्षेसाठी जी तयारी केलीये ती तयारी त्यांनी आपल्या पायाने केलीया कारण या विद्यार्थ्याला दोन्हीही हात नाही येत आणि पायाने लिहून सुद्धा या विद्यार्थ्यांचे अक्षर इतका सुंदर आहे की सर्वसामान्यांना त्याची लाज वाटेल,आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक प्रकारचे लोक मिळतील. त्यांपैकी काही लोक हे आपल्याकडे काही नाही म्हणून रडत बसतात. तर काही लोक आपल्याकडे का काहीच नाही? आणि आपल्याला ते मिळवायला पाहिजे या विचाराने पुढे जातात आणि आयुष्यात काहीतरी करुन दाखवतात. मग भले आयुष्यात त्यांना कितीही प्रॉबलम सहन करावे लागू शकतात.
अंबिकापूरमधील दिग्मा गावात राहणारा १७ वर्षीय महेश सिंग लहानपणापासूनच अपंग आहे. महेशचा एक हात नाही आणि दुसरा हात अविकसित आहे. महेशला अभ्यासाची आवड आहे, त्यामुळे हात नसतानाही त्याने लहानपणापासूनच पायाचा आधार घेतला आहे. महेशचं हस्ताक्षर इतकं सुंदर आहे की सामान्य लोकांनाही त्यांच्या हस्ताक्षराची लाज वाटू लागेल.महेश या वर्षी छत्तीसगड माध्यमिक शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या 12वी बोर्डाची परीक्षा देत आहे. महेशने सांगितले की त्याचे सर्व पेपर्स चांगले चालले आहेत. परीक्षा अजिबात अवघड वाटत नाही. महेशने सांगितले की तो पायाने हळू लिहितो पण तो 3 तासात सहज पेपर लिहितो. महेश आजपर्यंत कोणत्याही परीक्षेत नापास झाला नाही.
महेश त्याची आई, बहीण आणि भावोजीसोबत राहतो. शिक्षण घेऊन शिक्षक व्हावे, असे महेशचे स्वप्न आहे. म्हणूनच तो मनापासून वाचन-लेखन करून मेहनत करतो. परीक्षेतही तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतो. महेशचे भावोजी दुर्योधन सिंह टेकम यांनी सांगितले की, महेश खूप हुशार आहे. तसेच तो मेहनती आहे. महेश अभ्यासासोबतच त्यांच्या शेतात काम करतो.
महेश पायीच त्याच्या शाळेत जातो. या दिवसांत परीक्षा केंद्राच्या अंतरामुळे त्यांना थोडा त्रास सहन करावा लागत आहे. तरीही महेश पूर्ण हिंमतीने परीक्षा केंद्रावर जातो आणि परीक्षा लिहून आनंदाने घरी येतो. प्रशासन आणि शासनाकडून महेशला अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही ही खेदाची बाब आहे.