जगाच्या पाठीवर

उपचारांसाठी वेड्यांच्या इस्पितळात आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले, अजब प्रेमाची गजब कहाणी.

प्रेम कधी कोणावर होईल नेम नाही , प्रेम ही प्रेम असत,अश्या एका प्रेमाची कथा तुमच्या पुढे मांडणार आहोत.एक घटना चेन्नईमधील 228 वर्षं जुन्या इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थमध्ये घडलीय. इतक्या वर्षांच्या इतिहासात हा अनोखा प्रकार पहिल्यांदाच घडलाय असं आयएमएचतर्फे सांगण्यात आलंय. दोन रुग्ण उपचारांसाठी इथे आले. पण ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले हे त्यांनाही कळलं नाही. सुरुवातीला त्यांना एकमेकांच्या जवळ येण्यापासून थांबवलं गेलं. पण लवकरच हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की, हे दोघं एकमेकांपासून दूर राहू शकत नाहीत. त्यामुळे मग त्यांना सोडून दिलं गेलं. आता ते दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत.

प्रेम भावनेने जग जिंकता येतं असं म्हणतात. अशीच एक जगावेगळी लव्हस्टोरी चेन्नईतल्या आयएमएचमध्ये घडलीय. पी. महेंद्रन आणि दीपा उपचारांसाठी इथे आले. वडिलोपार्जित संपत्तीच्या वादावरून आप्तेष्टांमध्ये कटुता आल्याने महेंद्र अस्वस्थ झाला.या संपत्तीमुळे त्याच्या मनात भीती आणि काळजीने घर केलं. दुसरीकडे, दीपाचे वडिल 2016 साली वारले. वडिलांच्या मृत्युमुळे दीपाचं मानसिक संतुलन बिघडलं. आई आणि सख्खी बहीण असूनही तिला एकटं वाटायला लागलं. पण तिची मानसिक स्थिती इतकी बिघडली की, तिला आयएमएचमध्ये अ‍ॅडमिट करावं लागलं.

महेंद्र आणि दीपाला याची कल्पनाही नाही की, त्यांना आयएमएचमध्ये कधी भरती केलं. इस्पितळातील उपचारांसाठी आलेल्या लोकांपैकीच ते एक होते. काही महिन्यांपूर्वी महेंद्र आणि दीपाला इन्स्टिट्युटच्या कॅम्पसमध्ये असलेल्या ‘हाफ वे होम’मध्ये हलवण्यात आलं. ज्यांच्या मनोवस्थेत लक्षणीय सुधारणा झालीय, अशांनाच या ठिकाणी ठेवण्यात येतं. याच ठिकाणी ते एकमेकांच्या प्रेमात पडले.

दीपा आणि महेंद्र शुक्रवारी जवळच्याच देवळात लग्न करणार आहेत.अशी माहिती समोर येते, ही वेगळी प्रेम कथा कशी वाटली नक्की सांगा .

News Mall18

It is a News Channel where you can get all types of news like we have generated some category like Breaking News, Story News, Live News, Political News, Social news, Impact News Explainer Videos, Digital News, Viral News, Advertise News, Interviews, Promotions, Presentation, Entertainment, Related Movie Trailers, PRO, Awards Etc.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Share this news instead of copying!