हा शेतकरी करतो लाखोची उलाढाल, बळीराजाची ही यशोगाथा.
परभणी तालुक्यातील सोंन्ना येथील शिवाजी दंडवते या अल्पभूधारक शेतकऱ्याकडे चार एकर शेती आहे. कुटुंबामध्ये पत्नी आणि दोन मुले यांचा समावेश आहे. शेतीवर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात त्याचा सामना करावा लागत होता. शेतीवरील संकटांमुळं अनेक समस्याला तोंड द्यावे लागले. शेतीवर येणाऱ्या संकटांमुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न दंडवते यांच्यापुढं निर्माण झाला होता. संकटकाळात त्यांनी त्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाच्या व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्याला सुरुवात देखील केली.
घरामध्ये अठरा वर्षाचे दारिद्र्य त्यातच अल्पभूधारक शेतकरी असल्यानं पभणीच्या शिवाजी दंडवते यांच्यासमोर असंख्य प्रश्न होते. शिवाजी दंडवते यांच्यासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा असा प्रश्न समोर होता. सोंन्ना येथील शेतकरी शिवाजी दंडवते यांनी शेतीला पर्याय म्हणून दुधाचा जोडधंदा सुरू करण्याचा निर्णय घेतला केला. मात्र, तोच निर्णय दंडवते यांच्यासाठी वरदान ठरला आहे. शिवाजी दंडवते आणि कुटुंबीय दररोज बाजारपेठेमध्ये दुधाची विक्री करतात. त्यांना यातून दररोज दोन हजार रुपये नफा मिळत आहे. दुग्धव्यवसायाबद्दल बोलताना शिवाजी दंडवते सांगतात सुरुवातीपासून योग्य नियोजन आणि सातत्य राखल्यानं वर्षासाठी त्यांना सात लाख तीस हजार रुपये उत्पन्न प्राप्त होत आहे. या व्यवसायासाठी त्यांच्या घरातील चार माणसे दिवस रात्र जिवाचे रान करत आहेत.
दूध व्यवसायासाठी घेतलेल्या १८ म्हशींना चारा उपलब्ध व्हावा यासाठी दंडवते यांनी आपल्या चार एकर शेता पैकी एका एकरामध्ये मका आणि एका एकरामध्ये गवताची लागवड केली आहे. यामधूनच म्हशीला हिरवा चारा उपलब्ध होतो. यासोबतच पेंडीवर दिवसाकाठी पाच हजार रुपये खर्च त्यांना येतो असे शेतकरी शिवाजी दंडवते सांगतात. दंडवते कुटुंबाला म्हशीने दिलेल्या वासरांपासून देखील उत्पन्न प्राप्त होते. यासोबतच शेतीसाठी पोषक असलेलं शेणखत देखील दंडवते यांना मिळतो.
आता त्यांच्याकडे १८ म्हशी आहेत. या म्हशीचे दररोज दीडशे लीटर दूध परभणी येथे बाजारपेठेत आणि दूध डेअरीमध्ये विक्रीसाठी आणतात. या दुधाच्या विक्री मधून त्यांना दिवसासाठी दोन हजार रुपये निव्वळ नफा उरत आहे. दूध व्यवसायातून ते वर्षासाठी सात लाख तीस हजार रुपये इतके उत्पन्न प्राप्त करत आहेत. या दूध व्यवसायामध्ये त्यांना मदत करण्यासाठी पत्नी शांताबाई दंडवते, सुधाकर दंडवते, कोंडीबा दंडवते हे दोन मुले मदत करतात. त्यांनी अत्यंत उत्तम नियोजनाने दूध व्यवसाय केल्याने त्यांचे अर्थकारण आता सुधारले.