हृदयद्रावक : जन्मदात्या आईने सुपारी देत त्याची अश्याप्रकारे केली हाल.
आई आणि मूल हा यांच्या नात्याबद्दल बोलायलाच नको. त्यांच्यामधील प्रेम किंवा त्यांचा एकमेकांमध्ये असलेला जीव हे आपल्या सगळ्यांना माहीत असतं. एक आई नऊ महिने तिच्या पोटात त्या मुलाला सांभाळते. त्या दोघांचे नाते ही फक्त रक्ताचे नसून नाळेने सुद्धा जोडलेले असते. या जगामध्ये एक आईच अशी असते की, तिचे बाळ कसे असेल रंग- रूप हे न पाहताच ते बाळ पोटात असतानाच त्यावर प्रेम करायला लागते. आणि जेव्हा ते बाळ जन्म घेते तर त्याला लहानपणापासून अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याची काळजी घेत असते. त्या बाळाला व्यवस्थित संस्कार देऊन त्याची वाढ करत असते. जडण – घडण करत असते. या जगातील लोकांचा ती त्या मुलाला परिचय करून देत असते. आपला मुलगा सर्व गुण संपन्न असावा यासाठी ती प्रयत्न करत असते. पण जर त्या आईचा मुलगा शारीरिक विकलांग असेल ? तरी तिचे त्यावरचे प्रेम अजिबातही कमी होत नाही. पण या बातमीमध्ये आपल्याला थोडेसे वेगळे पाहायला मिळणार आहे. ही घटना नाशिक मधील नांदगावच्या ढेकू या ठिकाणची आहे.
सदरील बातमी मधील मुलाचे नाव जनार्दन पेंढारे असे आहे हा मुलगा मनोरुग्ण असल्यासारखा घरात वागत होता. आणि इतकंच नाही तर तो त्याच्या आईवडिलांना मारहाण देखील करत असायचा. आपला मुलगा मनोरुग्ण आहे त्याच्यापासून आपल्याला त्रास होतोय तरीदेखील त्या माऊलीने बऱ्याच दिवस या सगळ्या गोष्टी सहन केल्या. पण त्या सगळ्याचा अंत होताच त्या आईने वैतागून आपल्या मुलाची सुपारी दिली व त्याचा निर्गुणपणे हत्याचा डाव घडवून आणला.
हा जनार्दन बऱ्याच दिवसापासून त्याच्या आई-वडिलांना मारहाण करायचा व त्याची घरातील वागणूक देखील बदलली होती. म्हणून आई जनाबाई पेंढारे हिने हे टोकाचे पाऊल उचलले आणि गावातल्या समाधान याला १५ हजार रुपयांची सुपारी दिली. जनार्दन हा रात्री झोपला होता आणि झोपलेला असतानाच त्याच्या डोक्यावर वार करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह गोणीमध्ये भरून जवळच असलेल्या गावातल्याच एका विहिरीमध्ये फेकून देण्यात आला. पण तो मृतदेह पाण्यात न बुडता पाण्यावर तरंगत राहिला आणि जेव्हा ग्रामस्थांनी विहिरीमध्ये एक गोनी तरंगताना पाहिली तर त्या ग्रामस्थांना संशय आला आणि त्यांनी गोणी बाहेर काढली. गोणी बाहेर काढल्यानंतर त्या गोणीमध्ये जनार्दनचा मृतदेह आढळून आला आणि ग्रामस्थांनी याबाबत पोलिसांकडे माहिती दिली. लगेच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले व तपासामध्ये त्या तरुणाची हत्या ही त्याच्या आईनेच केली आहे याची माहिती समोर आली. या प्रकरणांमध्ये पोलिसांनी दोन्हीही आरोपींना अटक करून त्यांच्यावर खुणाचा गुन्हा दाखल केला आहे. एका जन्मदात्या आईनेच आपल्या मुलाची हत्या केली हे ऐकून त्या परिसरात खळबळ उडाली एक आई एवढी निष्टुर कशी होऊ शकते ? पोटच्या मुलाला अश्या प्रकारे कशी वागणूक देऊ शकते ? आणि एक जन्म देणारी आई आपल्या मुलाची सुपारी देऊ शकते का असा सवाल निर्माण केला जात आहे.