हि आहे, शरद पवार यांची सिल्व्हर ओक मधील बैठकीतील रणनीती.
महाराष्ट्र राज्यामध्ये राजकीय सत्तासंघर्ष बाबत जे काही घडामोडी आपण पाहत आहोतच. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन गट निर्माण झाले आहेत. एक म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिवसेना गट आणि दुसरा म्हणजे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शिंदे गट. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव सुद्धा ठेवले आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष.’ आता यामध्ये सगळ्यांचे लक्ष या गोष्टींवर आहे कि, अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये राजकारण चालू असताना शरद पवार नेमकं काय निर्णय घेणार आहेत ?
सध्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी घडत आहेत. यामध्ये राजकीय भूकंप व दरम्यान जे महाविकास आघाडी सरकार आहे ते वाचवण्यासाठी सध्या जोरात प्रयत्न चालू आहेत व बैठका होत आहेत त्याचप्रमाणे बैठकांना तसा वेग आला आहे नुकतेच शरद पवार यांनीदेखील बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याचं समोर आला आहे. ही जी बैठक झाली ती सिल्व्हर ओक या ठिकाणी झाली या ठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये आक्रमक रणनीती ठरली आहे. या वेळी शरद पवार महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्ष बाबत करणार आहेत यामध्ये काही सूचना घेऊन शरद पवार आता दिल्लीला जाणार आहेत.
बैठकीचा विषय काय ?
- गुवाहाटी मध्ये गेलेल्या आमदारांना संपर्क करा.
- गेले आमदार परत कसे येतील यासाठी प्रयत्न करा.
- बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जे संख्याबळ आहे ते तोडण्याचा प्रयत्न करत राहा.
- राज्यपाल राजभवनावर आले आहेत त्यांना संपर्क करण्याचा निर्णय घ्या.
- तांत्रिक मुद्दयांवर विधिमंडळ कायद्याचा प्रभावी वापर करण्याबाबत बातचीत.
- हायकोर्टात बाजू मांडण्याची वेळ येऊ शकते त्यासाठी तयारी ठेवा असेही चर्चेत सांगण्यात आले.
- तसेच सोबत प्रफुल्ल पटेल व अनिल देसाई हे रणनीती आखणार आहेत.
यादरम्यान संजय राऊत म्हणतात की, बंडखोर आमदारांपैकी अनेक जण आमच्या संपर्कात आहेत तसेच गुवाहाटी मधील काही आमदारांसोबत बोलणं झालं आहे. त्यांची परत शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा आहे. ज्यांना शिवसेनेमध्ये परत यायचा आहे त्यांच्यासाठी आमची दारं, खिडक्या कायम खुले असणार आहेत. गुवाहाटीमध्ये काय आहे? मुंबईत या ….. इथे पार्टी करा !! असे आवाहन संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केला आहे.