सैनिक पतीने फाशी घेताच, ६ दिवसात पत्नीने उचलले हे पाऊल.
तरुणांमध्ये सैन्यामध्ये भरती होण्याचे वेड जरा जास्तच असते. आणि भरती होण्यासाठी तसे प्रयत्न देखील करत असतात. त्यासाठी खूप परिश्रम घ्यावा लागतात. अभ्यासाबरोबरच शारीरिक चाचणी ही त्या ठिकाणी घेतली जाते. त्यामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी अभ्यास लागतो. तसेच शारीरिक चाचणीसाठी व्यायामही लागत असतो. शारीरिक चाचणी पूर्ण करून नंतर वेळ येते ती लेखी परीक्षा देण्याची व या दोन्ही मधून जो कोणी पास होतो त्याला सैन्य दलामध्ये भरती करून घेतल जाते. आणि त्या तरुणाचे सैन्यामध्ये भरती होण्याचे स्वप्न पूर्ण होत असते. त्यातही भरती झाल्यानंतर जर आपल्या आवडीचे ठिकाण मिळाले तर ती खुशी एक वेगळीच असते.
सैन्य दलामध्ये काम करत असताना काही वेळेस काही अनुचित गोष्टी देखील घडत असतात. यामध्ये काही सैनिकांना काम करत असताना त्यांच्या ड्युटीवर त्यांच्यावर दहशतवादी, नक्षलवादी हल्ले देखील होत असतात. आणि यामध्ये एखादा सैनिक त्याचा जीव गमावून बसतो किंवा तो शहीद होतो.
पण ही घटना वेगळीच आहे त्या सैनिक पतीचे व पत्नीचे बऱ्याच दिवसापासून कोणत्यातरी कारणावरून वाद चालू होते. आणि काही केल्या ते वाद मिटत नसल्यामुळे तो सैनिक पती गळफास लावून घेतो आत्महत्या करतो.
मिळालेल्या माहितीनुसार काश्मीरमध्ये तैनात असलेला सैनिक याचा मृतदेह लष्कराच्या छावणीमध्ये लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून येतो. या सैनिकाचे पत्नी सोबत कायमच भांडण चालू असतात. आणि या वादाला कंटाळून तो सैनिक आत्महत्या करतो. त्यांच्या लग्नाला नुकतीच दोन वर्षे पूर्ण झालेले असतात. याबाबत त्या सैनिक पतीच्या पत्नीला माहिती दिली असता या पत्नीला धक्का सहन झाला नाही आणि ही पत्नी पतीच्या मृत्यूनंतर सहा दिवसाने साडी ने गळफास लावून आत्महत्या करते. नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार सैनिक पती अरविंद व त्याची पत्नी आरती यांचे दोन जानेवारी 2019 रोजी लग्न झालेले आहे. पण गेल्या काही महिन्यापासून या दोघांमध्ये वाद होतात. आणि यामुळे त्या सैनिकाची पत्नी ही माहेरी राहू लागली होती.
सैनिक पतीच्या मृत्यूनंतर पत्नी खचलेली होती आणि यामुळेच तिने हे भयंकर पाऊल उचलले असे म्हटले जाते. ते सैनिकाची पत्नी तिच्या खोलीत मृत अवस्थेत आढळते. हे कुटुंबीयांना माहीत होतास ते तात्काळ पोलिसांना फोन करतात व या प्रकरणाबद्दल माहिती देतात. माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी पोहोचून मृतदेह खाली उतरवून तो पोस्टमार्टम साठी पाठवतात.