मित्राच्या लग्नात केलेला या तरुणाचा डान्स होत आहे सोशल मिडीयावर व्हायरल; व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही.

अरे अरे पाहा हा कसा नाचतोय तुम्ही पोट धरून हसणार, असे काही मोजकेच व्हिडियो असतात जे भावतात हसवतात ,काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. अशाच लग्नाच्या वरातीतील डान्सचा हा एक विचित्र व्हिडीओ आहे. एका तरुणाने इतका भन्नाट डान्स केला आहे की त्याचा डान्स व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.प्रत्येक डान्समधून काही ना काही व्यक्त केलं जातं. प्रत्येक डान्स काहीतरी सांगत असतो. मग तो नागिण डान्स का असेना.
नागिण डान्समधून सापाचं नृत्य दाखवलं जातं. या व्हिडीओतील तरुणही आपल्या डान्समधून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याने डान्स करता करता जे सांगितलं आहे, ते पाहून तुम्हाला मात्र तुमचं हसू बिलकुल आवरणार नाही.एखाद्या लग्नाच्या वरातीचं हे दृश्य दिसतं आहे. ढोल वाजत आहेत. त्याच्या तालावर एका बाजूला काही महिला नाचत आहे. तर ढोलवाल्यांच्या समोर एक व्यक्ती एकटीच डान्स करते आहे. या व्यक्तीचा डान्स सर्वांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळेच या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे
व्हिडीओ नीट पाहिलात तर सुरुवातीला ही व्यक्ती हातांनी काहीतरी कृती करताना दिसते. हातात काहीतरी धरल्यासारखं ती दाखवते. त्यानंतर तोच हात वाकडा करून काहीतरी ओतल्यासारखं दाखवते. त्यानंतर पोटावरून हात फिरवत, ती व्यक्ती विचित्र अंगात संचारल्यासारखं करते आणि शेवटी उलटी करताना दिसते.
असला कसला डान्स प्रकार :
डान्स करता करता पेग बनवण्यापासून उलटी करण्यापर्यंतची प्रोसेस ही व्यक्ती अशा पद्धतीने दाखवते जणू ती यातील चांगलीच अनुभवी असल्याचं दिसतं. काहीच न बोलता, दारू न पिता या व्यक्तीने दारूड्यांच्या मन की बात सांगितली आहे. दारू पिण्यापासून ते दारू प्यायल्यानंतर काय काय होतं ही संपूर्ण प्रक्रिया त्याने डान्समधून सांगितली आहे. फक्त दारू पिणाऱ्यांनाच नाही तर न पिणाऱ्यांसुद्धा त्या व्यक्तीला नेमकं काय सांगायचं आहे, ते समजतं.