पिकअप व्हॅनसह तिघे गेले वाहून, मालाचे पैसेही बुडाले, डोळ्यादेखत मित्रही गेला, बीडमधील घटना
महापूर ,पूर ,पातळीपेक्षा जास्त पाणी असेल अश्या वेळी त्या पाण्यातून जाऊ नये असे आवाहन केले जाते मात्र तरी ही काही बहादर त्याच पाण्यातून जातात आणि जीवं गमवतात , अश्या अनेक घटना समोर येते आहेत बीड जिल्यात असे केल्यामुळे तिघे वाहून गेले. गेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे. नद्या, नाले, ओढयांना पूर आला आहे,बीडच्या सिरसाळा – मोहा रस्त्यावरील ओढ्याच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पिकअपसह तिघे तरुण बुडाल्याची घटना घडली.
यात दोघांना वाचविण्यात यश आले आहे. तर एकजण अद्यापही बेपत्ता आहे. या बेपत्ता तरुणाचा अजूनही शोध घेतला जात आहे. रात्री पावसामुळे थांबलेल शोधकार्य सकाळपासून सुरू असून अद्याप शोध लागला नाही.रईस अन्सर अत्तार असं बेपत्ता तरुणाचे नाव आहे. दोघे व्यापारी असून फटाके माल आणण्यासाठी पिकअप घेऊन निघाले होते. त्यांच्याकडे फटाक्यांचा माल खरेदीसाठी पैशे होते. ते देखिल वाहून गेले.
दरम्यान, काल दिंद्रुड गावातील शेख रईस अन्सर अत्तार, शेख अखिल अत्तार आणि दिपक चोरघडे हे तिघे दिंद्रुडहून पिकअपमधून अंबाजोगाईकडे निघाले. सिरसाळा ते कान्नापूर- मोहा रस्त्यावरील गव्हाडा या ओढ्याला पूर आला आहे. चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने पिकअप ओढ्यात बुडाली.
पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने गाडीसह तिघे तरुण ओढ्यात शंभर फुटांपर्यंत वाहून गेले. गाडी ओढ्यात बुडाल्याचे समजताच स्थानिक ग्रामस्थ बचावकार्यासाठी धावले. शेख अखिल अत्तार आणि दीपक चोरघडे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र शेख रईस अन्सर अत्तार अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध सुरू आहे.