अशा प्रकारे झाला राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक बस चा लोकार्पण सोहळा.

पुणे शहरातील शंकर शेठ रोड वरील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयातून राज्यातील पहिल्या एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि नगर मध्ये राज्यात 1 जून 1948 रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला, तसेच नगर मध्ये राज्यात 1 जून 1948 सुरू झालेल्या एसटी बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आला.
शंकर शेठ रोड वरील एसटी कार्यालयाच्या वडाच्या झाडाखाली 1 जून 1948 रोजी महाराष्ट्र राज्यातील पहिली एसटी बस नगर पुणे या मार्गावर धावली होती व आता महाराष्ट्र राज्यातील पहिली इलेक्ट्रिक बस देखील त्याच मार्गावर धावणार आहे त्यामुळे एसटी महामंडळाकडून याठिकाणी स्मरणासाठी कोनशिला उभारण्यात आली आहे. तिचे उद्घाटन आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पुण्यातील कार्यक्रमात परिवहन मंत्री अनिल परब, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.