सावकारी जाचाला कंटाळून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, पहा बातमी सविस्तर.
आपण आपल्या आसपास सावकारी कर्ज घेतलेले बरेच जन पहिले असतील आणि सावकारी कर्ज घेतल्या नंतर त्यांची परतफेड करत असताना होणारी हाल देखील आपण पहिली असेल. बऱ्याचदा सावकारी कर्जाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतो हे सर्वश्रुत आहे महाराष्ट्राला माहिती आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामतीत व्याजाने घेतलेल्या पैशाला कंटाळून इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथील एकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जावेद अब्बास मुलाणी असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी नवाज अब्बास मुलाणी (वय ४०) वर्ष रा.भरणेवाडी ता इंदापुर यांच्या फिर्यादीवरून प्रफुल्ल रघुनाथ देवकाते रा.पिंपळी ता.बारामती जि पुणे, विजय मोटे रा .निरावागज ता. बारामती जि. पुणे, संदिप अरुण भोसले रा.निमसाखर ता. इंदापुर यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमान्वये वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावेद यांनी या तिघांकडून व्याजाने पैसे घेतले होते. व्याजाचे पैसे मिळावेत यासाठी हे तिघे जण वारंवार त्याच्याकडे तगादा लावत होते. आणि त्यामुळे आपल्या मुलाला सारखा त्रास होत होता असे ते पुढे म्हणाले. आणि यातूनच मुलगा आत्महत्येसाठी प्रवृत्त झाला आणि त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. इंदापूर तालुक्यातील जंक्शन कळस रोडवरील एका शेतकऱ्याच्या विहिरी शेजारी असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतला आणि त्याने आपले जीवन संपवले.
व्याजाचा पैशावर हे तिघे जीवे मारण्याची धमकी देत असल्यामुळे सतत त्रास होत होता. असं सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. पोलीस या घटनेचा कसून तपास करत आहेत. सावकाराच्या जाचाला कंटाळून पुणे जिल्ह्यातील बारामती मध्ये बारामतीतील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीतील या होतकरू तरुणाने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.