आईच्या नात्याला काळिमा फासला, यासाठी तिने ५ दिवसाच्या पोटच्या गोळ्यालाच विकले

आई !! आपण आईची उपमा देवाला देतो. आपल्याकडे असेही म्हणले जाते की, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी. एक आई आणि तिचं मूल या दोघांमधलं जे नातं असतं ते अत्यंत मजबूत असं नातं असतं. आपण म्हणतो की, आईसारखे दैवत सार्या जगतात कुठेही सापडणार नाही. परिस्थिती कशीही असो जर आपल्या लेकरांवर संकट चालून आली तर ती संकटं आपल्या मुलांवर येण्याआधी ती स्वतः ढाल बनून त्या संकटापुढे उभे राहते. स्वतःच्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी ती आपल्या स्वतःचा जीव धोक्यात टाकते. त्या आईच्या इच्छा-आकांक्षा, स्वप्न यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं तिला तिच्या मुलांच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न ही महत्त्वाची वाटायला लागतात. आणि ते पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असते.
पण या बातमीमध्ये आईच्या नात्याला काळिमा फासला गेला आहे. महिला या खूप हौशी असतात, असा आपण ऐकला आहे. आणि जिद्दी असतात असंही आपण ऐकला आहे. त्यांच्या हौशी पूर्ण करण्यासाठी त्या हर एक प्रकारचा प्रयत्न करत असतात. पण ती हाऊस पूर्ण करण्यासाठी म्हणून कोणती महिला आपल्या पाच दिवसाच्या बाळाला विकून टाकील का ?
तर या बातमीमध्ये एक महिला तिची हौस पूर्ण करण्यासाठी अवघ्या पाच दिवसात तिच्या बाळाला विकून टाकते. ही घटना युरोप मध्ये राहणाऱ्या एका महिलेची आहे. या महिलेने फक्त काही पैशांसाठी आपल्या पाच दिवसाच्या नवजात बाळाला विकले आहे. तिला या पैशांमधून तिचं स्वतःचं नाक सुंदर बनवायचं होतं. तिला ते नाक सुंदर बनवण्यासाठी नाकाची सर्जरी करायची होती. आणि तिच्याकडे पैसे नसल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं. आणि स्वतःचं पाच दिवसाचा बाळ हे विकून टाकलं. मानवी तस्करीचा आरोपाखाली आता तिला सध्या अटक करण्यात आली आहे.
मीडियाच्या माहितीनुसार या हौशी महिलेने आपल्या नवजात बालकाला फक्त तीन लाख रुपयांमध्ये विकले आहे. आणि या महिलेला ॲडव्हान्स म्हणून पंचवीस हजार रुपये देण्यात आले आणि महिनाभराने तिला १ लाख 29 हजार रुपये मिळणार होते. आणि या मिळालेल्या पैशातून तिला नाकाची सर्जरी करायची होती. पण बाळ विकल्यानंतर ते आजारी पडलं आणि चक्क या महिलेने आपली हौस पूर्ण करण्यासाठी म्हणून आपल्या पाच दिवसाच्या नवजात बालकाला विकला आहे. जी आई आपल्या मुलाला नऊ महिने पोटात वाढवते, ती आपल्या शुल्लक हौशी साठी त्या पोटच्या ५ दिवसाच्या बालकाला विकू देखील शकते यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण या जगात असेही काही लोक आहेत की, त्यांना त्यांच्या हौशी पुढे बाकी सर्व शून्य वाटतं !!