दुखःद : काळाचा माय लेकीवर घाला, शेततळ्यात गाडी पलटी झाली आणि….. पहा बातमी सविस्तर.

कोणासोबत कधी काय घडेल याचा काही अंदाज कोणाला लावता येत नाही, सकाळी उगलेला दिवस संध्याकाळ पर्यंत काय होईल काही सांगता येत नाही. अशीच एक घटना घडली आहे. अतिशय सुंदर असणाऱ्या मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
शेततळ्यात कार पलटी झाली आणि यात अंकिता सचिन बनसोडे वय वर्ष 29 आणि तृप्ती सचिन बनसोडे वय वर्ष ६ यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तनु सचिन बनसोडे हिला वडिलांनी वाचवल. ही घटना आराळी ता. तुळजापूर या ठिकाणी ही घटना घडली. या घटनेमुळे बनसोडे कुटुंबीयांवरती दुःखाचा डोंगर कोसळला.
कसई येथील सचिन बनसोडे हे आपल्या कुटुंबासमवेत आपल्या गाडीने रात्री दहाच्या सुमारास आराळी येथून कसई ला निघाले होते. आरळीतून तीन किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेत तळ्यात त्यांची कार पलटी झाली. यात साधारणता 15 ते 20 ft पाणी होतं . काच फोडून सचिन बनसोडे यांनी तनु चिमुकलीला वाचवले परंतु पाणी जास्त असल्याने आपली पत्नी आणि दुसरी मुलगी यांना वाचवण्यात त्यांना यश आलं नाही.
बाहेर येऊन मित्रांना फोन लावून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळतात पोलीस त्या ठिकाणी हजर झाले. अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. अंकिता बनसोडे यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला मात्र तृप्ती बनसोडे ही सापडत नसल्याने पाण्याच्या मोटारी लावून पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सकाळी सात वाजता तृप्तीचा मृतदेह पाण्यात सापडला.
या घटनेमुळे बनसोडे यांचा मुळगाव असणाऱ्या कसई या गावावरती शोकाकळा पसरली. एकाच वेळी मायलेकीचं अस अपघाती जाणं हृदय पिळटून टाकतात. या घटनेनं यात लहानग्या तनुचं आईचं छत्र कायमचा हरवल आहे.