दुखःद : क्लासवरून घरी जाताना १०वीच्या तनिष्कासोबत घडले असे काही, MSECB वर लावले जात आहेत आरोप.
आपल्याला मृत्यू कधी कुठे कसा गाठेल याचा काहीही नेम नसतो. असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या पापाचा घडा भरतो त्यावेळेस आपला मृत्यू जवळ आलेला असतो असंच काहीसं या बातमी मधील एका मुली सोबत घडले आहे.
इयत्ता दहावी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीचा भयानक रित्या मृत्यू झाला आहे. ही घटना विरारमध्ये घडली आहे. ती मुलगी क्लासवरून घरी येत होती घरी येत असताना तिच्यासोबत असं काही घडेल याचा तिला सुद्धा अंदाज आला नसेल.
ही मुलगी क्लास वरून घरी येत असताना अगदी घराच्या खालीच विजेचा शॉक लागून या मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली या मुलीच्या मृत्यूला जबाबदार MSECB असल्याचा आरोप सध्या केला जातोय.
सदरील मुलीचे नाव तनिष्का लक्ष्मण कांबळे वय वर्ष 15 असे आहे. विरार येथून क्लास करून घरी जाताना दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विजेचा शॉक लागल्यामुळे मृत्यू झाला. ती मुलगी कृष्णा मथुरा नगर येथील सोसायटीत राहते. आणि कृष्ण मथुरा नगर परिसरातच क्लासला जाते आणि क्लास वरून घरी येताना तिच्यासोबत ही घटना घडली आहे.
गेल्या दोन दिवसापासून विरारमध्ये रिमझिम पाऊस चालू होता. सोसायटीच्या समोरच रस्त्यावर पाणी साचलेला आहे त्या पाण्यात रस्त्याच्या खाली असलेल्या केबल ब्रेक झाले आहेत यामुळे केबल ब्रेक झाल्याने पाण्यात विजेचा प्रवाह चालू होता. त्याच पाण्यातून जाताना तनिष्क ला विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
यातील महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना तिच्या घराच्या जवळच घडली. आणि यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. सदरच्या घटनेला एमएसईबीचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा आरोप केला जातोय. आणि ठिकाणी एमएसईबीच्या केबल उघड्यावर आहेत. डीपी बॉक्स देखील उघडेच असतात सदरील मृत्यूला जबाबदार महावितरणचा निष्काळजीपणा आहे या मुलीच्या जाण्याने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
तिची शेजारी पाजारी, मित्र-मैत्रिणी यांना जेव्हा तनिष्काच्या मृत्यूचे वृत्त बातमी कळल्यानंतर धक्का बसला. पाण्यातून विजेचा प्रवाह चालू होऊन पाण्यातून चालताना या मुलीचा मृत्यू झाल्याचे वृत्त विरार शहरात वाऱ्यासारखे पसरले आणि यामुळे विरार शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.