दुखद : काहींचे रक्षाबंधन, तर काहीच्या घरावर शोकांतिका. पहा काय आहे बातमी सविस्तर.
रक्षाबंधनाच्या दिवशी धक्कादायक घटना घडली. आज एकाच दिवशी दोन जणांचा खून झाल्याची घटना घडली आहे. एकीकडे शहरात उत्साहात रक्षाबंधन हा सण साजरा होत होता. यातच उस्मानाबाद जिल्ह्यात वेगवेगळ्या दोन ठिकाणी दोन खून झाल्याची घटना घडल्या.
पहिली धक्कादायक घटना ही तुळजापूर शहरातील सिंदफळ या ठिकाणी घडली आहे. किसन सिद्धगणेश या 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. उमरगा शहरात एका पस्तीस वर्षाच्या मजुराचा अतिशय क्रूरपणे खून केल्याची घटना घडली आहे.
अजित पाटील हे उमरगा येथील मजूर आहेत या घटनांनंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल. काळे प्लॉट शेजारी असलेले कॉलेज परिसरातील अर्धवट बांधलेल्या इमारतीमध्ये अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्या ठिकाणी एका तरुणाच्या चेहर्यावरही अतिशय क्रूरपणे दगडाने मारहाण करून त्याचा चेहरा विद्रूप केला होता.
मयताची ओळख पटू नये यासाठी चेह-यावर दगडाची एक मोठी छावणी होती. दरम्यान चौकशी केली असता हा मयत अजित पाटील असल्याचं लक्षात आलं. काळे प्लॉट या ठिकाणी तो भाड्याने राहत होता. त्याचं मूळ गाव हालसी हातरंगा असं होता. उमरगा शहरात वास्तव्य करत होता प्रत्यक्षदर्शी नातेवाईकांनी हातावरती कोरलेल्या निशाण्यावर ओळख पटली.
शहरासह जिल्ह्यात रक्षाबंधन सण साजरा होत असताना आज जिल्ह्यात मात्र या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जिल्हा शोकाकुल झाला आहे. शहरात आणि जिल्ह्यात रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना आज दोन खुणाच्या घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जाते.