पुण्यात आता बसने प्रवास करा, मोफत अंघोळीचा लाभ घ्या पाहा काय आहे ऑफर ?
पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जातं. पीएमपी ने प्रवास करा आणि मोफत आंघोळीचा लाभ घ्या. असं पुणेकर प्रवासी म्हणतायेत प्रवास करून आंघोळीचा लाभ कसा घ्यायचा किंवा असं का म्हटलं जात आहे याकडे एक नजर टाकू. प्रवाशांना प्रशासनाकडं फक्त मनस्ताप येतोय. सध्या सर्वत्र पावसाला सुरुवात झाली या थोड्याफार प्रमाणात का होईना पण सातत्यानं पाऊस पडतो. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये प्रत्येकाला आपल्या घरी ये लवकर पोहोचण्याची घाई असते.
पाऊस हे नैसर्गिक असं संकट आहे ते कधी कमी कधी जास्त असंही होऊ शकता. त्यामुळे प्रत्येकाला सुरक्षित आपल्या घरी पोहोचण्याची घाई असते. मात्र प्रवाशांना योग्य सुविधा देत नाही. त्यामुळे प्रवासी आता संतापले आहेत. शहरात मान्सून सेल भरतात पुणे महानगर परिवहन महामंडळ यांनीही या मध्ये उडी घेतलेल्या त्यांच्याकडं पीएमपीने प्रवास करा. आणि मोफत आंघोळीचा लाभ घ्या अशी सुविधा पुरवण्यात येत असल्याची माऊथ पब्लिसिटी पुणेकर प्रवाशांकडून केली जात. या ठिकाणी पीएमटी बस थांबत नसल्याने प्रवाशांना प्रतीक्षेत पावसात भिजत थांबावं लागतं. कारण त्यांकडे दुसरा कुठलाही पर्याय नसतो त्यावर रोष व्यक्त केला आहे बसची वाट पाहत असताना धो धो पावसामध्ये या प्रवाशांना भिजावं लागतं.
बीओटी तत्वावर ते बंधारा वापरा व हस्तांतरित करा वा पंधराशे बसस्थानके उभारण्याचा निविदा दोन वेळा काढला होता त्यानंतर ही बस थांबा उभारण्यासाठी कोणीही पुढे येत नाहीये. पुणेकरांना त्यामुळेच पावसात भिजत भिजत प्रवास करावा लागतोय. याबाबत अनेक प्रवाशांनी शासनाकडे तक्रारी केल्यास त्यानंतरही कोणत्याही सुविधा उपलब्ध होत नाहीयेत. पुणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरगावचे ही लोक असतात, कारण की त्या ठिकाणी शिक्षणासाठी असंख्य विद्यार्थी पुण्यामध्ये असतात. त्यांना सुद्धा हा नाहक त्रास सहन करावा लागतो. पुणे शहरात चार हजारहून अधिक बस थांबे आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी फक्त पाट्या असून बस थांबा फक्त नावाला त्या ठिकाणी कुठल्याही सुविधा नाही.
उन्हाळ्यात उन्हापासून वाचायचं असेल तर प्रवासी झाडाचा सहारा घेऊ शकतात ते सावलीला उभे राहू शकतात, मात्र पावसाळ्यात आपण झाडाचा सावलीमध्ये किंवा झाडाचा आश्रय घेणे धोक्याचे ठरू शकतात. वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळतात वीज पडण्याची देखील दाट शक्यता असते. त्यामुळे प्रवासी झाडाखाली थांबण्यापेक्षा पावसात भिजण्याचा पसंत करतात. शासनामार्फत या प्रवाशांचे कुठलेही हाल होऊ नयेत यासाठी लवकरात लवकर बस थांबे उभे करावेत. अशी मागणी सर्वसामान्य पुणेकर प्रवासी करत आहेत. पीएमपी कडून सरासरी एक कोटीपेक्षा अधिक उत्पन्न मिळतं. पीएमपी 2000 बसेस आहेत तर दहा लाख एवढे प्रवासी आहेत. बसच्या फेऱ्या 20000 एवढ्या होतात बस थांबे चार हजारापेक्षा जास्त आहेत मात्र बहुतांश ठिकाणी सुविधांचा अभाव आहे आणि त्यामुळे प्रवाशांना अगदी मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे त्यांना ओल्या चिंब होऊन उन्हाळ्यामध्ये उन्हात राहणं अशा अनेक विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र तरीदेखील प्रवास करणं हे त्यांना गरजेचं असतं याकडे पुणे महानगरपालिकेने लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचं प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आता काहीतरी उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे.