” आमाला बी पोलीस आर्मीमधी भरती व्हायचंय. ” आदिवासी तरुणांनी व्यक्त केली खंत.
विजय चौधरी-सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यातील रामपूर वाडी हे अत्यंत कमी लोकसंख्या असलेले गाव या गावातील ग्रामस्थ आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह ऊसतोडणी, हातमजुरी, शेतमजुरी, मोलमजुरी करून भागवीत असतात या गावात जिल्हा परिषद अंतर्गत इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे तसेच लहान बालकांसाठी अंगणवाडी सुद्धा आहे मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या गावाकडे लक्ष नसून येथील तरुण इयत्ता चौथी नंतर गरिबीच्या परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी असमर्थ ठरत आहेत यामुळे येथील आदिवासी कुटुंबाची सदृढ आरोग्य असलेले मुले पुढील शिक्षण घेण्याची इच्छा असून सुद्धा परिस्थिती अभावी नाईलाजाने हातमजुरी, ऊसतोडणी, शेतमजुरी, व मोलमजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवीत आहे या गावात चौथीनंतर पुढील शिक्षण पोचविण्यास प्रशासन असमर्थ ठरत आहे……
आम्हालाही पोलिसात व आर्मीत भरती होण्याची इच्छा…
आमची गरिबीची परिस्थिती असल्यामुळे हात मजुरी शेतमजुरी मोलमजुरी करून जेमतेम आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह भागवतो त्यामुळे आम्ही चौथीनंतर पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ ठरत आहोत खरंतर आम्हालाही पोलिसात आर्मीत भरती होण्याची इच्छा आहे मात्र आमच्या परिवाराची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याकारणाने आम्ही पुढील शिक्षण घेण्यास असमर्थ ठरत आहोत त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हातमजुरी करून आमच्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवावा लागतो अशी खंत या आदिवासी गावातील तरुणांनी व्यक्त केली आहे तरीपण आम्ही आमचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी घरगुती व्यायाम शाळा तयार केली असून आम्ही नियमितपणे या ठिकाणी व्यायाम करीत असल्याची माहिती तरुणांनी दिली…..