अरे बाप रे ! तूर डाळ चक्क येवढ्या रुपयांनी महागली, पाहा काय आहेत आजचे भाव

आधीच महागाईमुळे नागरिक अधिक त्रस्त आहेत त्यातच या महागाईमुळे नागरिकांचे घर खर्च व त्याचं बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाची दर कमी झाल्याने सर्वसामान्यांना काही दिलासा मिळत आहे तोच डाळींच्या किमती पुन्हा एकदा वाढले आहेत. मात्र नागरिकांना दिलासा देण्यासाठी आता सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत.
तूर डाळीचे भाव अतिशय प्रमाणात वाढल्यामुळे यामध्ये केंद्र सरकारने लक्ष घालून यामध्ये उत्पादन केली जाणारी तुरदाळ व तूर डाळीची असलेली साठवण यावर लक्ष ठेवण्यास तसेच राज्यातील सर्व व्यापाऱ्यांनी जमा केलेल्या साठेची माहिती सरकारपर्यंत देण्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर राज्यांना सध्याच्या तूर साठ्याचा डेटा ग्राहक व्यवहार विभागाच्या ऑनलाइन मॉनिटरिंग पोर्टलवर अपडेट करावा लागणार आहे.
ऐन सणासुदीच्या काळात डाळीच्या किमती वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारने स्टॉक मध्ये ठेवलेली 38 लाख टन दाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे तसेच यात हरभऱ्याचाही समावेश आहे.
ग्राहक व्यवहार विभागाच्या माहितीनुसार हा देशात तूर डाळीच्या उत्पादनात यंदा घट होण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे तूर डाळीच्या बाबत वाढ झाली आहे. कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रमुख उत्पादक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि पाणी साचलेले पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आणि त्यामुळे या सगळ्याला फटका बसला असल्याचे सांगितले जात आहे.
कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी 47 लाख हेक्टर च्या तुलनेत यंदा केवळ 42 लाख हेक्टर क्षेत्रावर तूर पेरणी झाली आहे. मागील हंगामाच्या तुलनेत यावर्षी तूर लागवड ११ टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्या दोन महिन्यापूर्वी तूर डाळ किरकोळ भाव 100 रुपये प्रति किलो होती. परंतु आज ती डाळ 111 रुपये प्रति किलो वर पोहोचले आहे.